सामना हरला पण बांगलादेशच्या लिट्टन दासने केलाय खास पराक्रम!

पाऊस नसता आला तर बांगलादेशच्या लिट्टन दासचा दांडपट्टा भारतावर पडला असता भारी!

Updated: Nov 2, 2022, 08:18 PM IST
सामना हरला पण बांगलादेशच्या लिट्टन दासने केलाय खास पराक्रम! title=

Ind vs Ban T20 World Cup 2022 : भारत आणि बांगलादेशमध्ये (Ind vs Ban t-20 World Cup 2022) झालेल्या सामन्यामध्ये भारताने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला आहे. भारताकडून के. एल. राहुल 50 आणि विराट कोहलीने 64 अर्धशतके करत बांगलादेशसमोर 185 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. बांगलदेशचा संघ आव्हानाचा पाठलाग करायला आल्यावर त्यांनी खतरनाक सुरूवता केली. (T20 World Cup 2022 Ind vs Ban Bangladesh Litton Das scored the second fastest halfcentury Marathi Sport News)

बांगलादेशचा सलामीवीर लिट्टन दासने (Litton Das) आक्रमक सुरूवात करत भारताच्या गोलंदाजांना फोडून काढलं. दासची फलंदाजी पाहता सामना पूर्णपणे एका बाजूने झुकला असं वाटत होतं. 21 बॉलमध्येच दासने अर्धशतकही ठोकलं. या अर्धशतकासह दासने एक पराक्रम त्याच्या नावावर केला आहे. 

21 बॉलमध्ये अर्धशतक करणाऱ्या दासने टी-20 विश्वचषक 2022 मधील सर्वात वेगाने अर्धशतक करणाऱ्या यादीमध्ये दुसरं स्थान मिळवलं आहे. पहिल्या क्रमांकावर यजमान ऑस्ट्रेलियाचा मार्कस स्टॉयनिस असून त्याने अवघ्या 17 बॉलमध्ये श्रीलंकेविरूद्ध अर्धशतक केलं होतंं. 

आज रंगलेल्या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा पराभव केलाय. पावसाचा व्यत्यत आल्यामुळे टीम इंडियाचा पराभव निश्चित मानला जात होता. मात्र पाऊस थांबल्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कमाल करत सामना फिरवला. या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा 5 रन्सने पराभव केला. टीम इंडियाचा हा वर्ल्डकपच्या स्पर्धेतील तिसरा विजय होता. 

दरम्यान, अंतिम षटकात भारताला 20 धावांची गरज होती, युवा अर्शदीपने मोठ्या हिमतीने हे षटक टाकत भारताचा विजय निश्चित केला आहे. या सामन्यामध्ये भारताने 5 धावांनी विजय मिळवला.