T20 World Cup 2022: विराटच्या शानदार खेळीनंतर अनुष्काची भावुक पोस्ट, म्हणाली आज तू सर्वांच्या आयुष्यात...

टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकपमध्ये विजयी सलामी दिली आहे. पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे. पाकिस्तानने दिलेल्या 160 रन्सचा पाठलाग करत टीमने वर्ल्डकपमध्ये विजय मिळवला आहे. या सामन्यात विराट कोहली विजयचा खरा शिल्पकार ठरलाय. विराट आणि हार्दिक पंड्याने हरत आलेला सामना विजयाच्या दिशेने खेचून आणला. 

Updated: Oct 23, 2022, 07:02 PM IST
T20 World Cup 2022: विराटच्या शानदार खेळीनंतर अनुष्काची भावुक पोस्ट, म्हणाली आज तू सर्वांच्या आयुष्यात... title=

india win today anushka post for virat kohali  : टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकपमध्ये विजयी सलामी दिली आहे. पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे. पाकिस्तानने दिलेल्या 160 रन्सचा पाठलाग करत टीमने वर्ल्डकपमध्ये विजय मिळवला आहे. या सामन्यात विराट कोहली विजयचा खरा शिल्पकार ठरलाय. विराट आणि हार्दिक पंड्याने हरत आलेला सामना विजयाच्या दिशेने खेचून आणला. 

टीम इंडियाने रोमहर्षक सामन्यात पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव केला. रविचंद्रन अश्विनने (R. Ashwin) शेवटच्या चेंडूवर चौकार मारून भारताला विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने गेल्यावर्षीच्या वर्ल्डकपमधील पराभवाचा वचपा काढलाय.

आणखी वाचा: बायको पाकिस्तानची पण दिल है हिंदुस्थानी..ही जर्सी घालून करणार भारताला सपोर्ट

सर्व स्तरातून विराटचं खूप कौतुक होऊ लागलं आहे .. विराटची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माने (anushka sharma)  इंस्टाग्रामवर पोस्ट करत विराटचा कौतुक केलय. अनुष्काने आपल्या इंस्टाग्राम वर मॅचचे काही फोटो अपलोड करत भली मोठी पोस्ट करून विराटचा कौतुक केलय. सध्या सगळीकडे अनुष्काच्या पोस्टची जोरदार चर्चा आहे. (T20 World Cup 2022: anushka sharma emotional post for virat kohali on team india winning)

आणखी वाचा: T20 World Cup 2022 India Vs Pakistan: Babar Azam out होताच सोशल मीडियावर memesचा पाऊस

अनुष्काने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय '' सुंदर ! फारच सुंदर !  तू आज लोकांच्या आयुष्यात खूप मोठा आनंद दिला आहेस आणि तेही दिवाळीच्या पूर्वसंध्येला .. तू खूप अद्भुत आहेस तुझी जिद्द आणि विश्वास खूप ग्रेट आहे मी नुकताच माझ्या आयुष्यातील सर्वात सर्वोत्कृष्ट सामना पाहिला आहे आपल्या मुलीला आता कदाचित समजणार नाही कि  का तिची मुलगी रूममध्ये ओरडत होती नाचत होती, तरी एक दिवस तिला समजेल की तिच्या वडिलांनी त्या रात्री आपली सर्वोत्तम खेळी खेळली होती. आम्हाला तुझा खूप अभिमान आहे !! तुझासाठी खूप खूप प्रेम '' 

अनुष्काच्या या पोस्टने सर्वांचं मन जिंकलय. संपूर्ण भारत आज विजयाचा जल्लोष साजरा करतोय सर्व भारतीयांसाठी आज टीम इंडियाने खऱ्या अर्थाने दिवाळीच गिफ्ट दिलय असाच म्हणावं लागेल. (T20 World Cup 2022: anushka sharma emotional post for virat kohali on team india winning )