'रिलॅक्स, आता भारतात वर्ल्ड कप जिंकू', पाकिस्तानचा 'मुंगेरीलाल' शोएबला पडलं नवं स्वप्न!

इतका कॉनफिडन्स कुठून येतो! पाकिस्तानचा 'मुंगेरीलाल' शोएबचं स्वप्न होईल का पूर्ण? काय वाटतं   

Updated: Nov 14, 2022, 08:00 PM IST
'रिलॅक्स, आता भारतात वर्ल्ड कप जिंकू', पाकिस्तानचा 'मुंगेरीलाल' शोएबला पडलं नवं स्वप्न!    title=

Sport News : कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तरला (Shoaib Akhtar) 'मुंगेरीलाल'च्या स्वप्नासारखी स्वप्न पडत असल्याचं दिसत आहे. इंग्लंडकडून फायनलमध्ये पाकिस्तानला पराभव स्वीकारावा लागला होता. रोमहर्षक ठरलेल्या सामन्यामध्ये पाकिस्तानने कडवी झुंज दिली होती. यावर बोलताना शोएबने पाकिस्तान संघाचं समर्थन केलं आहे. मात्र त्यानंतर शोएब जे काही बोलला त्यावर तुम्हालाही हसू आवरणार नाही. (t20 wc shoaib akhtar shares message for pakistan cricket team we will win the world cup in india Sport marathi news)

बेन स्टोक्सला 2016 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये 4 षटकार मारले होते त्यामुळे सामना गमवावा लागला होता. मात्र त्याच स्टोक्समुळे 2022 आणि 2019 चा वर्ल्ड कप जिंकून दिला. संपूर्ण देश तुमच्या पाठिशी उभा आहे. आता आराम करा पुढचा वर्ल्ड कप भारतात जिंकू, असं शोएब अख्तरने म्हटलं आहे. 

पाकिस्तान संघ स्पर्धेतून बाहेर पडणार होतात मात्र अंतिम सामना खेळलात. पूर्ण वर्ल्ड कपध्ये पाकिस्तानच्या गोलंदाजांनी दमदार प्रदर्शन केलं. पाकिस्तानचा संघ अंतिम सामना खेळण्यासाठी पात्र होता. शाहीनची दुखापत हा टर्निंग पॉइंट होता पण ठीक आहे, निराश होऊ नका, असंही अख्तरने म्हटलं आहे. 

दरम्यान, 2023 चा वनडे वर्ल्ड भारतात होणार आहे. याचाच धागा पकडत शोएबने पाकिस्तान संघाचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रय्तन केला. मात्र ही स्पर्धा इतकी सोपी राहणार नाही. कारण तोडीस तोड तगडे संघ असणार आहे, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतात वर्ल्ड कप होणार असल्याने भारतीय संघ प्रबळ दावेदार मानला जात आहे.