वेलिंग्टन : टी 20 वर्ल्ड कपनंतर (T 20 World Cup 2022) आता टीम इंडिया न्यूझीलंडला (India Tour New Zealand 2022) पोहचली आहे. टीम इंडिया या न्यूझीलंड दौऱ्यात टी 20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात टी 20 मालिकेने होणार आहे. या मालिकेत एकूण 3 सामने अनुक्रमे 18, 20 आणि 22 नोव्हेंबरला पार पडणार आहेत. यानंतर 25 नोव्हेंबरपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. टी 20 मालिकेत हार्दिक पंड्या तर वनडे सीरिजमध्ये शिखर धवन टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. (team india tour new zealand nz vs ind t 20 and odi series hardik pandya and shikhar dhawan lead)
निवड समितीने न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या अनुभवींना विश्रांती तर खेळाडूंना संधी दिली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, दिनेश कार्तिक आणि आर आश्विनला विश्रांती दिलीय. तर संजू सॅमसन, उमरान मलिक, वॉशिंग्टन सुंदरसारख्या युवा खेळाडूंना संधी दिलीय.
हार्दिक पंड्या (कॅप्टन), ऋषभ पंत (उपकर्णधार/ विकेटकीपर), शुबमन गिल, ईशान किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार आणि उमरान मलिक.
दरम्यान टी 20 सीरिजनंतर 25, 27 आणि 30 नोव्हेंबरला एकदिवसीय सामन्यांचा थरार रंगणार आहे. या एकदिवसीय मालिकेत शिखर धवन टीम इंडियाचा कॅप्टन असणार आहे.
शिखर धवन (कॅप्टन), ऋषभ पंत (उपकर्णधार/विकेटकीपर), शुबमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकूर, शहबाज अहमद, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, दीपक चाहर, कुलदीप सेन आणि उमरान मलिक.