T20 World Cup PAK VS AFG Warm Up Match: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीनं टी 20 वर्ल्डकप स्पर्धेत कमबॅक केलं आहे. भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी शाहीननं जोरदार सराव केल्याचं सामन्यातून दिसून आलं. अफगाणिस्तानविरुद्धच्या सराव सामन्यात शाहीन आफ्रिदीनं (Shaheen Afridi) भेदक गोलंदाजी केली. शाहीननं ब्रिस्बेनवर चार षटकात 29 धावा देऊन दोन गडी बाद केले. पहिल्या दोन षटकात त्याने स्विंग आणि वेगाने चेंडू टाकत दोन गडी बाद केले. यावेळी अफगाणिस्तानी फलंदाज जखमी झाला. त्याला खांद्यावरून पॅवेलिनमध्ये न्यावं लागलं.
शाहीननं पहिल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रहमानउल्ला गुरबाजला तंबूचा रस्ता दाखवला. त्याला आफ्रिदीचा यॉर्कर खेळताच आला नाही. चेंडू त्याच्या अंगठ्याला लागला. आफ्रिदीने एलबीडब्ल्यूची अपील केली आणि पंचांनी गुरबाजला बाद घोषित केले. आफ्रिदीच्या चेंडूवर गुरबाजला हलण्याची संधीही मिळाली नाही. यॉर्कर इतका भेदक होता की त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली. त्याला पॅव्हेलियनपर्यंत जाताही येत नव्हते. तेव्हा सहकारी खेळाडू मैदानात पोहोचले आणि त्याला खांद्यावर घेऊन गेले.
Shaheen Afridi is Back pic.twitter.com/JdBkNjkS45
— Ayesha | shanzay stan (@aasho56) October 19, 2022
Shaheen Shah Afridi went to Rahmanullah Gurbaz and asked him about the seriousness of his injury. Great gesture by Shaheen Afridi. Earlier Shaheen had stuck the yorker on Gurbaz's toe. #PAKvAFG #ShaheenShahAfridi #T20WorldCup #WarmUpMatch pic.twitter.com/Mbk0u5LJde
— Ahmad Haseeb (@iamAhmadhaseeb) October 19, 2022
You are already one of the most feared bowlers in the world! Shaheen Afridi pic.twitter.com/BkiKGqe01T
— KH SAKIB (@Crickettalkss) October 19, 2022
डाव संपल्यानंतर शाहीन आफ्रिदी अफगाणिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्ये गेल्या. त्याने जखमी गुरबाजला भेटला आणि दुखापतीबाबत विचारपूस केली. गुरबाजची जखम पाहता आता तो या स्पर्धेत खेळेल की नाही याबाबत शंका आहे.