मुंबई : भारताचा तुफानी फलंदाजपैकी एक सुर्यकुमार यादवचं (Suryakumar Yadav) नाव येत. सध्या तो 2022 मध्ये सर्वाधिक T20I धावा करणारा खेळाडू आहे. त्याने यावर्षी खेळल्या गेलेल्या 20 सामन्यांमध्ये 37.88 च्या सरासरीने आणि 182.84 च्या तुफानी स्ट्राइक रेटनं सर्वाधिक 682 धावा केल्या आहेत. सुर्यकुमारच्या खेळाचे आणि त्याच्या स्टाइलचे लाखो चाहते आहेत. त्याच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्याची इच्छा त्याच्या चाहत्यांना असते.
सुर्यकुमारनं त्याची गर्लफ्रेंड देविशा शेट्टीसोबत 5 (Devisha Shetty) वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 2016 साली लग्न करण्याचा निर्णय घेतला. ते दोघे कॉलेजमध्ये होते तेव्हा पासून रिलेशनशिपमध्ये आहेत. सूर्यकुमारनं अनेकवेळा त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीचे श्रेय पत्नी देविशाला दिले. (suryakumar yadavs mantra prior a match day spend time with wife)
सूर्यकुमारने अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, 'पत्नी देविशा ही त्यांची सर्वात मोठी सपोर्टर आहे. कामगिरी काहीही असो, ती नेहमी त्याच्या पाठीशी उभी राहते आणि त्याला प्रेरित करते.' टाईम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत सूर्यकुमारला विचारण्यात आले की सामन्याच्या एक दिवस आधी तो कोणता गेम प्लॅन बनवतो का की तो खूप नेट प्रॅक्टिस करतो?
यावर उत्तर देत सूर्यकुमार म्हणाला, 'सामन्याच्या 2 दिवस आधी तो बॅटला हातही लावत नाही. तर सामन्याच्या फक्त 1 दिवस आधी, तो आपल्या पत्नीसोबत मोकळा वेळ घालवतो. या काळात क्रिकेटबद्दल अजिबात बोलत नाही.'
सूर्यकुमारची पत्नी देविशा शेट्टीचा जन्म 1993 मध्ये मुंबईत झाला. 2013 ते 2015 या काळात तिनं ‘द लाइटहाऊस प्रोजेक्ट’ या एनजीओसाठी स्वयंसेवक म्हणून काम केले. देविशाबद्दल असं म्हटलं जातं की तिला कॉलेजच्या दिवसांपासून डान्सची खूप आवड आहे. कॉलेजच्या कार्यक्रमात देविशाचा डान्स पाहिल्यानंतर सूर्यकुमारला ती आवडू लागली होती.