Suryakumar Yadav sign on Rohit Sharma bat : असं फार क्वचित पहायला मिळतं, जिथे एखादा फलंदाज त्याची बॅट (Bat) सोडून इतर कोणाची बॅट घेऊन मैदानात उतरला. भारत-बांगलादेश (IND vs BAN 1st ODI) यांच्यामध्ये झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात असंच काहीसं चित्र पहायला मिळालं. या सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) ज्या बॅटने खेळत होता, त्यावर सूर्यकुमारचं नाव लिहिलं होतं. हा व्हिडीओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social Media Viral) चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. चाहत्यांनी हा व्हिडीओ पाहून रोहितने सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) बॅट वापरली असल्याचं म्हटलंय.
दरम्यान या गोष्टीमध्ये किती तथ्य आहे, याबाबत अजून माहिती नाहीये. सूर्यकुमार यादवचा बांगलादेश विरूद्धच्या सिरीजमध्ये टीम इंडियाचा हिस्सा नाहीये. वर्कलोड मॅनेजमेंटचा विचार करत सूर्यकुमारला आराम देण्यात आला आहे. टी-20 वर्ल्डकपनंतर सूर्यकुमार न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेला होता. त्या ठिकाणी सूर्याने टी-20 करियरमधील दुसरं शतकं झळकावलं होतं.
रोहित आणि सूर्यकुमार दीर्घकाळापासून एकमेकांसोबत खेळत आहेत. दोघंही मुंबईकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले आहेत. इतकंच नाही तर आयपीएलमध्येही रोहित आणि सूर्या मुंबई इंडियन्स या टीमचा भाग आहेत. त्यामुळे जर रोहितने खरंच सूर्याच्या बॅटचा वापर केला असेल तर त्यामध्ये कोणती मोठी गोष्ट नाही.
— Guess Karo (@KuchNahiUkhada) December 5, 2022
रोहित शर्माचा जो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, तो भारतीय डावातील 5 व्या ओव्हरचा आहे. या ओव्हरमध्ये रोहितने हसन महमूदच्या बॉल कव्हर्समध्ये खेळला होता. त्याचवेळी त्याच्या बॅटखाली ‘SK Yadav’ असं लिहिलेलं कॅमेरात कैद झालं आहे. ज्यानंतर असा अंदाज लावण्यात येतोय की, रोहित शर्माने पहिल्या वनडे सामन्यात सूर्याची बॅट वापरली होती.
पहिल्या वनडे सामन्यात जरी रोहितने सूर्याची बॅट वापरली असली, तरीही त्याला त्या बॅटने मोठा खेळ करता आला नाही. या सामन्यात त्याने 31 बॉल्समध्ये केवळ 27 रन्स केले. टीम इंडिया या संपूर्ण सामन्यात 41.2 ओव्हरमध्ये 186 रन्सवर ऑल आऊट झाली होती. तर बांगलादेशाने या लक्ष्याचा पाठलाग करत 1 विकेटने भारताचा पराभव केला.