'जसजसं वय वाढत जाईल तसा...,' सूर्यकुमार यादवचं सरफराजबद्दल मोठं विधान, म्हणाला 'तो जाड असून त्याला...'

भारतीय क्रिकेटर सऱफराज खान (Sarfaraz Khan) जबरदस्त कामगिरी करत असल्याने क्रिकेट समीक्षक आणि चाहते सतत त्याचं कौतुक करत आहेत.  

शिवराज यादव | Updated: Oct 20, 2024, 05:31 PM IST
'जसजसं वय वाढत जाईल तसा...,' सूर्यकुमार यादवचं सरफराजबद्दल मोठं विधान, म्हणाला 'तो जाड असून त्याला...'  title=

भारतीय क्रिकेटर सऱफराज खान (Sarfaraz Khan) जबरदस्त कामगिरी करत असल्याने क्रिकेट समीक्षक आणि चाहते सतत त्याचं कौतुक करत आहेत. सरफराज आपल्या कामगिरीने चोख उत्तर देत असला तरी, त्याच्या फिटनेसवर मात्र सतत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. फिटनेसमुळेच तो प्लेईंग 11 मधून बाहेर पडू शकतो असा दावा अनेक तज्ज्ञ करत आहेत. यादरम्यान सूर्यकुमार यादवने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे. ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी मालिकेत फिट राहण्यासाठी सरफराज खान ऋषभ पंतने सुचवलेल्या शेफसह सध्या मेहनत घेत आहे असं सूर्यकुमार यादवने सांगितलं आहे. 

"सरफराज भारतीय संघाचे स्ट्रेंग्थ आणि कंडिशनिंग प्रशिक्षकासह त्याच्या तंदुरुस्तीवर काम करत आहे, ऋषभ पंतने त्याला एक शेफ उपलब्ध करून दिला आहे जो त्याच्या जेवणाची काळजी घेतो. ऑस्ट्रेलियात बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळण्यासाठी पोहोचेपर्यंत पूर्णपणे तंदरुस्त व्हावं असा त्याचा हेतू आहे. स्पोर्ट्समध्ये वय वाढत जाईल त्यानुसार फिटनेस महत्वाचा असतो. कारण शरिरात बदल होत जातत. तो आता कठोर परिश्रम करत आहे, भविष्यात त्याला फायदा होईल," असं सूर्यकुमार यादव म्हणाला आहे.

"त्याच्या शारिरीक रचनेमुळे तो जाड दिसतो. पण जर तुम्ही त्याला 450 चेंडू खेळण्यास सांगितलं किंवा डबल, ट्रिपल सेंच्युरी करायला लावली तरी तो करेल. त्याच्याकडे ते कौशल्य आहे. त्याने मोठी शतकं ठोकावीत अशी संघाचीही अपेक्षा आहे. त्याने सामन्याचं चित्रं पालटणाऱ्या खेळी कराव्यात. तो सामन्याच्या दिवशीही प्रशिक्षणाला हजेरी लावते. जर सामना असेल तर तो पहाटे 5 वाजता उठवतो. घऱाजवळ एक तास फलंदाजी करतो आणि नंतर टीम बसमध्ये आमच्यासह येते. सामन्यानंतर तो पुन्हा जवळच्या मैदानात जाऊन फलंदाजीचा सराव करतो," अशी माहिती सूर्यकुमारने दिली आहे.

बंगळुरू कसोटीत न्यूझीलंडविरुद्ध भारतासाठी पहिले शतक झळकावल्यानंतर, सरफराज खान म्हणाला, देशासाठी पहिलं शतक झळकावणे ही माझ्यासाठी सुखावणारी भावना होती. सरफराज खानने 195 चेंडूत 76.92 च्या स्ट्राईक रेटने 150 धावांची खेळी केली. त्याने 18 चौकार आणि 3 षटकार खेचले. भारताच्या दुसऱ्या डावातील 85 व्या षटकात टीम साऊदीने त्याची विकेट घेतली. 

न्यूझीलंकडून भारताचा पराभव

बंगळुरू येथे पार पडलेल्या पहिला टेस्ट सामन्यात न्यूझीलंडने 8 गडी ऱाखून भारताचा पराभव केला. यासह न्यूझीलंडने भारतात टीम इंडिया विरुद्ध कसोटी सामना जिंकून 36 वर्षांचा दुष्काळ संपवला आहे. यापूर्वी न्यूझीलंडने 1988 मध्ये भारतात कसोटी सामना जिंकला होता.