India VS Pakistan : ऑस्ट्रेलियामध्ये 16 ऑक्टोबरपासून टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup 2022) सुरुवात झाली आहे. भारतीय संघ (Team India) यंदाही विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. रोहित शर्माकडे (Rohit Sharma) भारतीय संघाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी आहे. टीम चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने आता पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा धुव्वा उडणार हे नक्की आहे. अशातच आता भारताचा स्टार फलंदाज सुरेश रैना (Suresh Raina) याने मोठं वक्तव्य केलंय.
क्रिकेटतज्ज्ञ भारत पाकिस्तान सामन्याबाबत अंदाज बांधत आहेत. अशातच सुरेश रैनाने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमबद्दल (Babar Azam) एक भाकीत वर्तवलं आहे. रैनाने बाबरचे वर्णन महान फलंदाज म्हणून केलंय. त्यावेळी कोणता बॉलर बाबरची विकेट घेणार याबद्दल रैनाने भाकित देखील वर्तविलं आहे.
भारत आणि पाकिस्ताचा (India VS Pakistan) सामना रंगदार होईल. बाबर आझम (Babar Azam) महान फलंदाजांपैकी एक आहे. मला वाटतं की, भारत पाकिस्तान सामन्यात अर्शदीप सिंह (Arshdeep Singh) बाबर आझमची विकेट काढेल, असं सुरेश रैना म्हणाला आहे.
बाबर आझम एक चांगला कर्णधार आणि खरोखरच चांगला क्रिकेटर आहे. त्याने आपल्या संघासाठी खरोखरच चांगली कामगिरी केलीय. पण आशा आहे की, अर्शदीप सिंग आमच्याविरुद्ध खेळायला आल्यावर त्याला बाहेर काढेल, असं सुरेश रैना (Suresh Raina) पुढे म्हणाला.
दरम्यान, अर्शदीप सिंहचा हा पहिलाच वर्ल्ड कप (T20 World Cup 2022) आहे. त्यामुळे त्याच्यावर देखील दबाव असणार आहे. अर्शदीपने आतापर्यंत फक्त 13 सामने खेळले आहेत. त्यात त्याने 19 विकेट घेत कमाल दाखवली होती. त्यामुळे त्याच्या घातक गोलंदाजीचा सामना पाकिस्तानी खेळाडू कसा करतील, यावर आता सर्वांचं लक्ष आहे.