क्रिकेट वर्तुळात शोककळा! दिग्गज खेळाडूंना घडवणाऱ्या प्रशिक्षकाचं निधन

क्रिकेट वर्तुळातून सर्वांत मोठी बातमी, सुरैश रैनाकडून दु;खद बातमी शेअर 

Updated: Aug 21, 2022, 10:15 PM IST
क्रिकेट वर्तुळात शोककळा! दिग्गज खेळाडूंना घडवणाऱ्या प्रशिक्षकाचं निधन  title=

मुंबई : क्रिकेट वर्तुळातून सर्वांत मोठी बातमी समोर आली आहे. दिग्गज खेळाडूंना घडवणाऱ्या एका क्रिकेट प्रशिक्षकाचं निधन झाल्याची घटना घडलीय. टीम इंडियाचा माजी क्रिकेटर सुरेश रैनाने याबाबतची माहिती दिलीय. या बातमीने क्रिकेट वर्तुळात शोककळा पसरली आहे. 

टीम इंडियाचा माजी क्रिकेटर सुरेश रैनाने याच्या बालपणीचे प्रशिक्षक सतपाल कृष्णन यांचे निधन झाले आहे. रैनाने ट्विट करून याबाबतची माहीती दिलीय.  'माझे प्रशिक्षक कृष्णन सर यांच्या निधनाची बातमी ऐकून मन दुखावले आहे. माझ्या सर्व यश आणि परिश्रमामागे त्यांचा हात होता. त्यांनी मला शिकवलेला धडा कधीच विसरता येणार नाही. ते नेहमी माझ्या आठवणींमध्ये आणि प्रार्थनांमध्ये असतील. त्यांच्या कुटुंबियांना आणि प्रियजनांबद्दल माझ्या मनापासून संवेदना, असे त्याने म्हटलेय. 

दरम्यान सतपाल कृष्णन हे जालंधर येथील रुग्णालयात व्हेंटिलेटरवर होते आणि त्यांना लाइफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आले होते. रैनानेही सतपाल कृष्णन यांच्या उपचारात खूप मदत केली पण त्यांना वाचवता आले नाही, आणि त्यांचा अखेर मृत्यू झाला.  

आत्मचरित्रात उल्लेख
सुरेश रैनाने आपल्या 'बिलीव्ह' या आत्मचरित्रात सतपाल कृष्णन यांचाही उल्लेख केला आहे. लहानपणी सतपाल कृष्णन यांनी त्याला क्रिकेटमधील बारकावे समजून घेण्यात खूप मदत केली होती. सुरेश रैनाने शालेय जीवनात उत्तर प्रदेशातील गुरु गोविंद सिंग स्पोर्ट्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता जिथे त्याने इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंत शिक्षण घेतले होते. यादरम्यान सतपाल यांनी रैनाला प्रशिक्षण दिले होते.

कारकिर्द 
सुरेश रैनाने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. रैनाने 18 कसोटी सामन्यात शतकाच्या जोरावर 768 धावा केल्या. या मधल्या फळीतील फलंदाजाने टीम इंडियासाठी 226 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भाग घेतला. यादरम्यान रैनाने पाच शतकांसह 5615 धावा केल्या. त्याचवेळी, 78 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये रैनाच्या नावावर 1604 धावा आहेत.