IPLच्या 'या' टीममध्ये मोठा गोंधळ; का दिला कोचने तडकाफडकी राजीनामा?

आयपीएलएची मेगा ऑक्शन झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या कोचपदाचा राजीनामा दिला आहे.

Updated: Feb 18, 2022, 02:59 PM IST
IPLच्या 'या' टीममध्ये मोठा गोंधळ; का दिला कोचने तडकाफडकी राजीनामा? title=

मुंबई : नुकतंच बंगळूरूमध्ये आयपीएल मेगा ऑक्शन पार पडली. दरम्यान या ऑक्शननंतर आता सनराइजर्स हैदराबादच्या ताफ्यात एक मोठा घोळ झाला आहे. टीमचे असिस्टेंट कोच साइमन कॅटीचने अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएलएची मेगा ऑक्शन झाल्यानंतर कॅटीचने त्याच्या कोचपदाचा राजीनामा दिला आहे.

ऑक्शननंतर SRHच्या टीममध्ये मोठा गोंधळ

आयपीएल 2022च्या सुरुवातीला सायमन कॅटीचचा असा अचानक राजीनामा देणं टीमसाठी मोठा धोका निर्माण होऊ शकतो. इतकंच नव्हे तर राजीनामा देताना त्याने टीमवर अनेक आरोपंही लावले आहेत. 

द ऑस्ट्रेलियनने दिलेल्या माहितीनुसार, ज्या पद्धतीने टीमला चालवलं जातं त्या पद्धतीवर सायमन कॅटीच नाराज होते. त्याचप्रमाणे मेगा ऑक्शनपूर्वी जो प्लॅन करण्यात आलेला त्यावरही कॅटीच नाराज असल्याची माहिती आहे. 

नाराजीने सोडलं पद

या सर्व प्रकारानंतर कॅटीचने हैदराबाद टीम सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयानंतर आता टीमच्या मालकांवर ही फ्रेंचायझी योग्य पद्धतीने सुरु ठेवण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलेत. गेल्यावर्षी एका वर्षात तीन कोचने हैदराबादची साथ सोडलं असल्याचं समोर आलं आहे.