मुंबई : नुकतंच आयपीएलच्या 15व्या सिझनपूर्वी मेगा ऑक्शन बंगळूरूमध्ये पार पडलं. यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरवरही बोली लावण्यात आली. मुंबई इंडियन्सने 30 लाख मोजत अर्जुनला आपल्या ताफ्यात सामील करून घेतलंय. दरम्यान अर्जुनबाबत सचिनने एक मोठा खुलासा केला आहे.
सचिनने सांगितलं की तो अर्जुनला कधी खेळताना पाहत नाही. यामागील कारणंही सचिनने स्पष्ट केलं आहे. सचिन सांगतो की, मी अर्जुनला खेळताना पाहत नाही कारण माझी इच्छा आहे ती त्याने मोकळेपणाने खेळलं पाहिजे.
सचिन म्हणतो, आपले वडील आपल्याला खेळताना पाहयात याचं त्याच्यावर कधीही दडपण येऊ नये.
"काही वेळा मी त्याला न सांगता त्याची मॅच पहायला जातो. ज्यावेळी आई-वडील पाहतात तेव्हा मुलांवर दबाव येऊ शकतं. याच कारणामुळे मी तो खेळताना शक्यतो त्याला पाहत नाही. मला असं वाटतं त्याने क्रिकेटवर प्रेम केलं पाहिजे आणि त्यासंदर्भात त्याने फोकसंही केलं पाहिजे," असंही सचिन तेंडुलकरने सांगितलंय.
2021 मध्येही मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला खरेदी केलं होतं. मात्र त्याला एकंही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे आता 15 व्या सिझनमध्ये रोहित शर्मा त्याला प्लेईंग 11मध्ये संधी देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.