KKR vs SRH:कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर (Eden Gardens) आयपीएल 2023 मधील 19 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनराईजर्स हैदराबाद (Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात हैदराबादने कोलकाताचा 23 धावांनी पराभव केला आहे. त्यामुळे आता केकेआरने (KKR) 4 सामन्यात तिसरा विजय नोंदवला आहे.
हैदराबादने कोलकातासमोर 229 धावांचं आव्हान दिलं. होतं, त्याचा पाठलाग करताना हैदराबादची सुरूवात चांगली झाली नाही. सलामीवीर गुरबाज स्वस्तात परतला. त्यानंतर व्यंकटेश अय्यर आणि सुनिल नारायण देखील खास कामगिरी करू शकले नाहीत. त्यानंतर मात्र, कॅप्टन नितीश राणा (Nitish Rana) याने सुत्र हातात घेतली. राणाने 41 चेंडूत 75 धावांची झुंझार खेळी केली. त्यात त्याने 6 सिक्स तर 5 फोर खेचले.
सामना रोमांचक स्थितीत पोहोचला होता. कोलकाताला 24 बॉलमध्ये 70 धावांची गरज होती. राणा आणि रिंकू सिंह मैदानात असल्याने कोलकाता सामना जिंकेल, असं वाटत होतं. मात्र, नटराजनने कॅप्टन राणाची विकेट काढली आणि सामना आख्खा पलटला. रिंकू आणि शार्दुलने अखेरीस आक्रमक खेळ दाखवला. अखेरच्या ओव्हरला कोलकाताला 32 धावांची गरज होती.
Captain leading from the front in the chase!
A quickfire FIFTY for @NitishRana_27
Follow the match https://t.co/odv5HZvk4p#TATAIPL | #KKRvSRH | @KKRiders pic.twitter.com/5ByH0oDLYk
— IndianPremierLeague (@IPL) April 14, 2023
त्याआधी, प्रथम फलंदाजी करताना हैदराबादची सुरूवात चांगली झाली. सलामीवीर मयंक अग्रवाल स्वस्तात परतला. त्याने फक्त 9 धावा केल्या. त्यानंतर त्रिपाठी देखील लवकर बाद झाला. त्यानंतर आलेल्या मार्करमने कॅप्टनी पारी खेळली आणि हॅरी ब्रुकला मोलाची साथ दिली. त्यानंतर अभिषेक शर्मा आणि क्लासेनने षटकारांचा पाऊस पाडत इनिंग अंतिम टप्प्यावर नेली. हॅरी ब्रुकने (Harry Brook) शतक झळकावलं आहे. फक्त 55 बॉलमध्ये त्याने शतक साजरं केलं. या इनिंगमध्ये आंद्रे रसलने (Andre Russell) 2 ओव्हरमध्ये 3 विकेट पटकावले.