रिंकू सिंहची तुलना युवराज सिंगशी केल्यावर भडकले सुनिल गावस्कर, म्हणाले 'त्याचा एक अंश पण नाही...'

Sunil Gavaskar on Rinku Singh : रिंकू सिंहची तुलना युवराज सिंगशी (Yuvraj Singh) केल्याने लिटिल मास्टर सुनिल गावस्कर यांना संताप अनावर झाला. त्यावेळी त्यांनी या प्रकरणावर आपलं रोखठोक मत व्यक्त केलं आहे.

सौरभ तळेकर | Updated: Dec 11, 2023, 02:10 PM IST
रिंकू सिंहची तुलना युवराज सिंगशी केल्यावर भडकले सुनिल गावस्कर, म्हणाले 'त्याचा एक अंश पण नाही...' title=
Sunil Gavaskar on Rinku Singh vs Yuvraj Singh

Rinku Singh vs Yuvraj Singh : व्हाईट बॉल क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज कोण? असा प्रश्न विचारला तर न चुकता सर्वांच्या मुखी नाव येईल ते युवराज सिंग याचं... टीम इंडियाला दोन वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या युवराजने (Yuvraj Singh) अनेक सामन्यातून भारताला संकटमुक्त केलंय. फलंदाजीच नव्हे तर मोक्याच्या क्षणी त्रिफळा उडवण्यात युवीचा हात कोणीही धरू शकत नाही. टीम इंडियाच्या या स्टार खेळाडूशी तुलना आता कोणत्याही खेळाडूसोबत केली जाते. कधी शिवम दुबे तर कधी देवदत्त पेडिक्कल... अशातच आता रिंकू सिंहची (Rinku Singh) तुलना युवराज सिंगशी केल्याने लिटिल मास्टर सुनिल गावस्कर (Sunil Gavaskar) यांना संताप अनावर झाला. त्यावेळी त्यांनी या प्रकरणावर आपलं रोखठोक मत व्यक्त केलं आहे.

काय म्हणाले Sunil Gavaskar ?

सध्या रिंकू सिंहची तुलना युवराज सिंगशी केली जातीये. युवराज सिंगने भारतीय क्रिकेटसाठी जे काही केलंय, त्याच्या छोटा अंश जरी रिंकू सिंहने करून दाखवला तरी त्याचं करियर यशस्वी होईल. तो सर्वोत्तम परफॉर्मन्स म्हणता येणार नाही. त्याला आत्ताच युवराज सिंग म्हणजे त्याच्यावर प्रेशर टाकण्यासारखं असेल. त्याच्या परफॉर्मन्सवर त्याचा परिणाम दिसून येईल. मात्र, रिंकू सिंगने आपली दाखवून स्वत:ला युवराजशी तुलना करण्यासाठी लोकांना भाग पाडलंय, जी त्याची ताकद आहे, असं सुनिल गावस्कर यांनी (Sunil Gavaskar on Rinku Singh) म्हटलं आहे.

प्रत्येकाला असं टॅलेंट मिळत नाही. तुम्हाला खेळ आवडू शकतो. तुम्ही दिवसभर खेळू शकता, पण कधी-कधी तुम्हाला माहीत आहे की, तुमच्याकडे पुरेसं टॅलेंट नसू शकते. पण त्याला खात्री आहे की तो हे करू शकतो. मी बघतोय त्याची गेल्या 3 ते 4 वर्षापासून धडपड सुरू आहे. आयपीएलमध्ये, तो अनेक संघांमध्ये खेळत राहिला आणि बाहेरही राहिला, शेवटी जेव्हा त्याला संधी मिळाली, असं सुनिल गावस्कर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, रिंकू सिंह याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-ट्वेंटी मालिकेत दमदार कामगिरी करत सर्वांना आपल्या टीम इंडियातील आगमनाचे संकेत दिले होते. अशातच आता साऊथ अफ्रिकेविरुद्ध रिंकू सिंहच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष असणार आहे.  टी-20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. आता या मालिकेतील दुसरा सामना 12 डिसेंबरला होईल.