Sunil Gavaskar : जेव्हा गावस्करांनी लाईव्ह सामन्यात अंपायरकडून केस कापून घेतलेले...!

Sunil Gavaskar Birthday : गावस्कर यांचे मैदानावरील अनेक किस्से प्रसिद्ध आहेत, यातीलच एक किस्सा म्हणजे मैदानावर केस कापून घेण्याचा. यामध्ये त्यांनी मैदानावरील अंपायरकडून केस कापून घेतले होते. मुख्य म्हणजे गावस्कर यांचे केस कापण्यासाठी सामना देखील थांबवण्यात आला होता. 

सुरभि जगदीश | Updated: Jul 10, 2023, 04:29 PM IST
Sunil Gavaskar : जेव्हा गावस्करांनी लाईव्ह सामन्यात अंपायरकडून केस कापून घेतलेले...! title=

Sunil Gavaskar Birthday : सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar ) हे नाव जगातील कोणत्याही क्रिकेट प्रेमीला काही नवं नाही. लिटील मास्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar Birthday ) यांचा आज वाढदिवस आहे. गावस्कर आज त्यांचा 74 वा वाढदिवस साजरा करतायत. जागतिक क्रिकेटमध्ये भारताला ओळख मिळवून देण्यात सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar ) यांचा मोठा वाटा मानला जातो. गावस्कर यांचे मैदानावरील अनेक किस्से प्रसिद्ध आहेत, यातीलच एक किस्सा म्हणजे मैदानावर केस कापून घेण्याचा. 

सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar ) यांचा किस्सा फार लोकांना माहिती नाहीये. यामध्ये त्यांनी मैदानावरील अंपायरकडून केस कापून घेतले होते. मुख्य म्हणजे गावस्कर यांचे केस कापण्यासाठी सामना देखील थांबवण्यात आला होता. 

भर मैदानात अंपायरने कापले होते गावस्करांचे केस

ही घटना 1974 ची आहे. ओल्ड ट्रेफोर्डच्या मैदानावर भारत विरूद्ध इंग्लंड ( Ind Vs Eng ) यांच्यामध्ये सामना सुरु होता. यावेळी सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar ) फलंदाजी करत होते. त्या काळात गावस्कर यांचे केस प्रचंड मोठे होते. मोठ्या केसांमुळे त्यांना खेळताना बॉल पाहण्यात अडचण येत होती. त्यावेळी गावस्कर ( Sunil Gavaskar ) यांनी उत्तम शक्कल लढवून अंपायर डिकी बर्ड यांच्याकडून केस कापून घेतले होते. 

अंयायरने त्यांने बॉलचा धागा कापण्यासाठीची कैची मागवून घेतली. त्यावेळी अंपायर डिकीने त्या कैचीच्या माध्यमातून गावस्कर ( Sunil Gavaskar ) यांचे केस कापले होते. गावस्करांचा हा किस्सा चांगलाच लोकप्रिय होता.

वेस्ट इंडिजविरूद्ध केलेला डेब्यू

सुनील गावस्कर यांनी 1971 साली पोस्ट ऑफ स्पेनच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध टेस्टमध्ये डेब्यू केला होता. सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar ) यांनी डेब्यूच्या टेस्टमध्ये पहिल्या डावात 65 रन्स ठोकले होते. या सिरीजमध्ये गावस्कर यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध 154.80 च्या सरासरीने एकूण 774 रन्स केलेले.