Sunil Chhetri in tears : कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियमवर (Salt Lake Stadium) झालेल्या सामन्यानंतर अखेरचा सामना खेळणाऱ्या भारताच्या कॅप्टनला म्हणजेच सुनील छेत्रीला (Sunil chhetri) सर्वांनी उभं राहुन मानवंदना दिली. प्रेक्षकांनी आणि खेळाडूंनी दाखवलेलं प्रेम पाहून सुनील छेत्रीला अश्रू अनावर झाले. अखेरच्या सामना खेळणाऱ्या दिग्ग्जाला भारतीय संघाने गार्ड ऑफ ऑनर दिला. सुनील छेत्रीला पाहण्यासाठी तब्बल 60 हजार प्रेक्षकांनी मैदानात हजेरी लावली होती. छेत्रीला अखेर सामना खेळताना पाहताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.
A very emotional moment for Sunil Chhetri. He couldn't hold his tears as the team members give him guard of honor. pic.twitter.com/wt2qjuDs9A
— Himanshu Pareek (@Sports_Himanshu) June 6, 2024
फिफा वर्ल्डकप पात्रता फेरीतील भारत आणि कुवेत सामना बरोबरीत राहिला. दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. त्यामुळे दोन्ही संघांना एक एक गुण वाटून देण्यात आले आहेत. दोन्ही संघांनी तगडी भिडत दिली. दोन्ही संघांना गोल करण्याची संधी देखील मिळाल्या होत्या. मात्र, संधीचं सोनं करता आलं नाही. भारतीय संघाने देखील कॅप्टनला विजयाचं गिफ्ट देण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र, अखेर सामना बरोबरीत सोडवावा लागला. सामना संपल्यानंतर मैदानात भावूक वातावरण पहायला मिळालं.
कॅप्टन सुनील छेत्रीने आंतरराष्ट्रीय करियरमध्ये 150 सामन्यांमध्ये 94 गोल केले आहेत आणि सक्रिय खेळाडूंमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्यांच्या यादीत क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लिओन मेस्सी यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. सुनील छेत्रीच्या नेतृत्वात भारतीय संघाने 11 चषक जिंकले आहेत.
सुनील छेत्रीचा उत्तराधिकारी कोण ?
फुटबॉल संघाचं भविष्य उज्जवल आहे. संघ माझ्यासाठी थांबणार नाही. मनवीरसारखे आणखी प्लेयर्स माझा जागा भरून काढतील, असं छेत्रीने म्हटलंय. लल्लियांझुआला छांगटे, रहीम अली आणि मनवीर सिंग यांसारखे खेळाडू भारतीय संघाला नव्या उंचीवर पोहोचवू शकतात. विक्रम प्रताप सिंग हा सुनील छेत्रीसह स्ट्राईकर राहिला आहे. त्यामुळे विक्रम प्रताप सिंग याच्याकडून संघाला अपेक्षा असतील.