बाबर आझमला हवीये अशी बायको, लाईव्ह शोमध्ये सांगितलं 'या' क्वालिटी पाहिजेत

Babar Azam On future Wife : पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमला आता लगीनघाई झाली आहे. अशातच एका कार्यक्रमात बाबरने त्याला पत्नीला कशा क्वालिटी हव्यात? यावर उत्तर दिलंय.

सौरभ तळेकर | Updated: Jun 6, 2024, 07:44 PM IST
बाबर आझमला हवीये अशी बायको, लाईव्ह शोमध्ये सांगितलं 'या' क्वालिटी पाहिजेत title=
Babar Azam On future Wife

Rameez Raja Viral Video : आयसीसी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत (T20 World Cup 2024) टीम इंडियाने आयर्लंडला पराभूत करत विजयाचा श्रीगणेशा केलाय. तर दुसरीकडे आज पाकिस्तान पहिला सामना यजमान युएसएविरुद्ध (USA vs PAK) खेळेल. त्यानंतर पाकिस्तान आणि भारत येत्या 9 जून रोजी आमने सामने (IND vs PAK) येणार आहे. त्यामुळे आता चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचलीये. पाकिस्तानचा पुन्हा पराभव करण्यासाठी टीम इंडिया उत्सुक दिसत असल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता बाबर आझमचं टेन्शन वाढलंय. त्याला कारण पाकिस्तान संघाचा फॉर्म... पाकिस्तान भारताविरुद्ध टिकणार कशी? असा प्रश्न अनेकांना पडलाय. अशातच आता पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम (Babar Azam Video) याचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

पाकिस्तानचा विराट कोहली म्हणून ओळखला जाणारा बाबर आझम एलिजिएबल बॅचलर म्हणून ओळखला जातो. बाबर आझमची पाकिस्तानमध्ये मोठी क्रेझ आहे. बाबर आझमच्या खासगी आयुष्याबद्दल अनेकांना कुतूहल असतं. अनेक तरुणी बाबर आझमवर फिदा आहेत. अशातच आता बाबर आझमच्या घरात लवकर लग्नाच्या सनईचौघड्या वाजण्याची शक्यता आहे. बाबरच्या वडिलांनी काही दिवसांपूर्वी बाबरच्या लग्नाबद्दल घाई असल्याचं वक्तव्य केलं होतं. अशातच आता वर्ल्ड कपपूर्वी दिलेल्या मुलाखतीमध्ये बाबर आझमने कशी बायको पाहिजे? यावर खुलासा केला आहे.

वर्ल्ड कपपूर्वी बाबर आझम एका टीव्ही शोमध्ये पोहोचला होता, त्यावेळी पाकिस्तानचा माजी कर्णधार रमीझ राजा अँकरची भूमिका साकारत होता. रमीझ राजाने बाबरला त्याच्या लग्नाविषयी प्रश्न केला. तुला लग्न करायचं का? असा सवाल जेव्हा रमीझ राजाने विचारला तेव्हा... होय नक्कीच करणार आहे, प्रश्नाला काय अर्थ आहे? असं बाबरने म्हटलं अन् सर्वत्र हास्यक्ल्लोळ झाला. त्यावेळी रमीझ राजाने गुगली फेकली. मुलीमध्ये कोणते गुण असायला हवेत? असा सवाल बाबरला विचारला. तेव्हा, मुलीला सगळ बॅटने खेळता आलं पाहिजे, मुलीला थ्रो डाऊन करता आलं पाहिजे, असं बाबर (Babar Azam On future Wife) म्हणाला अन् सर्वत्र हसू फुटलं.

दरम्यान, बाबर आझम लवकर लग्न करण्याची शक्यता आहे. वनडे वर्ल्ड कपवेळी जेव्हा बाबर आझम भारतात आला होता, तेव्हा बाबरने 7 लाखाची खरेदी केली होती. त्यावेळी त्याने शेरवानी देखील खरेदी केली होती. त्यामुळे आता बाबर लवकर लग्नबंधनात अडकणार, अशी शक्यता वर्तविली जात होती.