IPL निकालात फेरफार, भाजप नेत्याचा गंभीर आरोप, चौकशीची मागणी

IPL 2022 वर गुजरात टायटन्सने नाव कोरले आहे. 

Updated: Jun 3, 2022, 07:52 PM IST
IPL निकालात फेरफार, भाजप नेत्याचा गंभीर आरोप, चौकशीची मागणी   title=

मुंबई : IPL 2022 वर गुजरात टायटन्सने नाव कोरले आहे. 2022च्या पदार्पणाच्या वर्षात आयपीएल ट्रॉफी उंचावणारा तो प्रथम संघ ठरलाय. दरम्यान आता आयपीएलच्या निकालात फेरफार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. एका भाजप आमदाराने हा आरोप केला आहे. या आरोपावर आता बीसीसीआय काय उत्तर देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  

भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी IPL 2022 मध्ये फेरफार झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाच्या चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे. सुब्रमण्यम स्वामी ट्विट करत आरोप केले आहेत. सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, आयपीएलच्या निकालात फेरफार झाल्याचा गुप्तचर यंत्रणांचा विश्वास आहे. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. त्यासाठी जनहित याचिका दाखल करणे आवश्यक आहे. आता सरकार ही याचिका दाखल करणार नाही कारण अमित शाह यांचा मुलगा बीसीसीआयचा हुकूमशहा असल्याची टीका त्यांनी केली आहे. 
 
सुब्रमण्यम स्वामी यांच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर नवा वाद सुरु झाला आहे. अनेक यूजर्सनी आयपीएल २०२२ च्या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.