नवी दिल्ली : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला वनडे सामना १७ सप्टेंबरला होणार आहे. ऑस्ट्रेलिया टीम भारतात पोहोचली आहे. मात्र, ही सीरीज सुरू होण्याआधीच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीवन स्मिथ याला विराट सेनेचं भय सतावत आहे.
स्मिथ म्हणाला की, ‘ही सीरीज आमच्यासाठी बरीच कठीण असणार आहे. टीम इंडिया सध्या चांगलीच फॉर्ममध्ये आहे. त्यांनी नुकतीच श्रीलंकेला मोठी मात दिली. अशात आमच्यासाठी ही सीरीज आव्हानात्मक असेल’.
स्मिथ पुढे म्हणाला की, ‘आम्ही सीरीजसाठी फारच उत्साहित आहोत. आम्ही चांगला खेळ करण्याच्या विचाराने आलो आहोत’. २०१३ मध्ये खेळल्या गेलेल्या सीरीजचा उल्लेख करत तो म्हणाला की, मी याआधीच्या भारत दौ-यात येऊ शकलो नव्हतो. त्या सीरीजमध्ये बरेच रन्स झाले होते. फ्लॅट पिचवर मोठे स्कोर उभे करण्यात आले होते. अशात आम्हाला वेगळी रणनिती आखावी लागेल आणि त्यानुसारच खेळावं लागेल.
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १७ सप्टेंबरला चेन्नईत, २१ सप्टेंबरला कोलकाता आणि २४ सप्टेंबरला इंदोरमध्ये पहिल्या तीन वनडे मॅच होणार आहेत. यावेळी आर अश्विन आणि जडेजा यांना विश्रांती देण्यात आली आहे. तर या सीरीजसाठी निवडण्यात आलेल्या टीममध्ये उमेश यादव आणि मोहम्मद शमी यांना संधी देण्यात आली आहे.
टीम इंडिया -
विराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, मनीष पांडे, केदार जाधव, अजिंक्य रहाणे, महेंद्र सिंह धोनी, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव आणि मोहम्मद शमी.