Steve Smith Run Out Controversy : स्मिथ आऊट की नॉट आऊट? पाहा MCC चा नियम काय सांगतो?

Steve Smith Run Out Ashes 2023 Controversy : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या टेस्टमध्ये पुन्हा एकदा एका रनआऊटच्या निर्णयाने खळबळ उडालीये. स्मिथ ( Steve Smith ) च्या या रनआऊटच्या या प्रकरणात मोठा वांदग माजलेला दिसला.

सुरभि जगदीश | Updated: Jul 29, 2023, 05:46 PM IST
Steve Smith Run Out Controversy : स्मिथ आऊट की नॉट आऊट? पाहा MCC चा नियम काय सांगतो? title=

Steve Smith Run Out Ashes 2023 Controversy : सध्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड ( England vs Australia ) यांच्यामध्ये पाचवा आणि निर्णायक सामना खेळवला जातोय. या सामन्यावर इंग्लंडचं वर्चस्व दिसत येत असून इंग्लंडने पहिल्या डावात 283 रन्स केले. यानंतर ऑस्ट्रेलिया 295 रन्सवर ऑलआऊट झाली. ऑस्ट्रेलियाने यापूर्वीच सिरीजमध्ये 2-1 अशी आघाडी घेतलीये. पण या टेस्टमध्ये पुन्हा एकदा एका रनआऊटच्या निर्णयाने खळबळ उडालीये.

स्मिथच्या रनआऊटवर नवा वाद

ऑस्ट्रलिया फलंदाजी करत असताना 77.3 ओव्हर्समध्ये ही घटना घडली. यावेळी स्टिव्ह स्मिथ ( Steve Smith ) पॅट कमिन्ससह दोन रन्स पूर्ण करण्यासाठी धावला. मात्र याचदरम्यान विकेटकीपर जॉनी बेअरस्टोच्या हातात बॉल आल्याने त्याने रन आऊट केलं. यावेळी स्टिव्ह स्मिथ ( Steve Smith ) ने देखील उडी मारून रन पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मात्र थर्ड अंपायरने मात्र त्याला नॉट आऊट करार दिला. यानंतर सोशल मीडियावर ( Third Umpire ) पुन्हा एक नवा वाद निर्माण झाला.

स्मिथला आऊट करार का नाही दिला?

स्मिथ ( Steve Smith ) च्या या रनआऊटच्या या प्रकरणात मोठा वांदग माजलेला दिसला. मात्र यामध्ये नियम काय सांगतो हे जाणून घेऊया. मेरीलेबोन क्रिकेट क्लब म्हणजेच एमसीसीने याबाबत ट्विट केलंय. ते त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात की, या व्हिडिओबाबत आम्हाला अनेक प्रश्न आलेत. या प्रकरणात लॉ 29.1 म्हणतो, जोपर्यंत बेल्स स्टंपवरून पूर्णपणे खाली पडत नाहीत किंवा स्टंप जागेवरून हलत नाही तोपर्यंत खेळाडूला बाद दिलं जाणार नाही. स्मिथच्या रनआऊट निर्णयाच्या व्हिडिओमध्ये, बेअरस्टो बॉलने स्टंप उडवत असताना, बेल्स पूर्णपणे हललेली नव्हती.

हे वाचा- स्मिथच्या रनआऊटमुळं Ashes दरम्यान भर मैदानात हाय व्होलटेज ड्रामा; Out की Not Out?

 

काय आहे संपूर्ण प्रकरण?

जॉनी बेअरस्टोने बॉलने स्टंप उडवल्यानंतर इंग्लंड टीमने रनआऊटसाठी अपील केलं. मुख्य म्हणजे यावेळी स्टीव्ह स्मिथला तो बाद आगे झाला असं वाटत असल्याने तो पॅव्हेलियनच्या दिशेने निघाला. पण त्यानंतर मैदानावरील अंपायर्सने सामन्याचे थर्ड नितीन मेनन यांची मदत घेतली. 

नितीन मेनन यांनी वेगवेगळ्या अँगलमधून रनआऊट तपासून पाहिला. अखेरीस स्टीव्ह स्मिथला नाबाद करार देण्यात आला. यावेळी थर्ड अंपायरने दिलेला निर्णय पाहून इंग्लंडचे खेळाडू मात्र चांगलेत हैराण झालेले दिसून आले. या विकेटवरून क्रिकेट तज्ज्ञांमध्ये दुमत असल्याचं दिसून आलं.