एकाच बॉलवर Six आणि Out! पंचांपासून मैदानातील प्रत्येकजण गोंधळला; पाहा Confusing Video

Toby Roland Jones :   25 जुलै रोजी झालेल्या या सामन्यात मोठा हायव्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला. मिडलसेक्स आणि वारविकशायर (Warwickshire vs Middlesex) यांच्यामध्ये हा सामना रंगला होता. मिडलसेक्स्च्या टीमने 8 विकेट्सने हा सामना जिंकला.

सुरभि जगदीश | Updated: Jul 29, 2023, 04:41 PM IST
एकाच बॉलवर Six आणि Out! पंचांपासून मैदानातील प्रत्येकजण गोंधळला; पाहा Confusing Video title=

Toby Roland Jones : आतापर्यंत तुम्ही अनेक चित्र-विचित्र विकेट्स पाहिल्या असतील. यावेळी अनेकदा फलंदाजाची काहीही चूक नसताना त्याला पव्हेलियनचा रस्ता धरावा लागतो. अशीच काहीशी घटना घडली ती सध्या खेळल्या जात असलेल्या काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये पहायला मिळाली. 25 जुलै रोजी झालेल्या या सामन्यात मोठा हायव्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला. 

मिडलसेक्स आणि वारविकशायर (Warwickshire vs Middlesex) यांच्यामध्ये हा सामना रंगला होता. मिडलसेक्स्च्या टीमने 8 विकेट्सने हा सामना जिंकला. मात्र या सामन्यात कर्णधार टोबी रोलँड जोन्स ( Toby Roland Jones ) ज्या प्रकारे आऊट झाला, त्यामुळे सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली होती. 

सिक्स मारूनही त्याने गमावली विकेट

मिडलसेक्सचा कर्णधार टोबी रोलँड जोन्सची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. रोलँड जोन्सला ( Toby Roland Jones ) सिक्स मारल्यानंतर आऊट करार देण्यात आला. झालं असं की, सामन्यात जोन्सने ( Toby Roland Jones ) सिक्स मारला आणि त्याच बॉलवर तो बाद झाला. आता तुम्ही म्हणाल असं कसं? 

सामना सुरु असताना 50 व्या ओव्हरमध्ये ही घटना घडली. फलंदाज रोलँड जोन्सने ( Toby Roland Jones ) लाँग - ऑनवर सिक्स लगावला. दरम्यान सिक्स लगावल्यानंतर तो इतक्या आनंदात होता की, त्याला स्वत:वर नियंत्रण ठेवता आले नाही. यावेळी आनंदाच्या भरात त्याची बॅट विकेटला लागली.

यावेळी विकेटकीपर मायकेल बर्जेस याच्या लक्षात ही गोष्ट आली आणि त्याने हिट विकेट इतर खेळाडूंच्या लक्षात आणून दिली. यानंतर रोलँड जोन्सला स्वतःच्याच चुकीवर पव्हेलियनमध्ये परतावं लागलं.

स्वतःच्याच पायावर मारला धोंडा

कर्णधार टोबी रोलँड जोन्स ज्या पद्धतीने आऊट झाला त्यामुळे तो खूप संतापला. मुख्य म्हणजे यामध्ये कोणाचाही दोष नव्हता. मात्र स्वतःच्या चुकीचा फटका सहन करावा लागला. रोलँड जोन्सने पहिल्या डावात 21 रन्स केलेत. मात्र त्याच्या विकेटची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली असून जोन्सला ट्रोल देखील करण्यात आलं.