मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्व बॉल टेम्परिंगच्या मुद्द्यावरून ढवळून निघाले आहे. या प्रकरणी स्टीव्ह स्मिथने मीडियासमोर येऊन आपली चूक मान्य केली आहे तसेच याप्रकरणी सार्यांची माफी मागितली आहे. स्टीव्ह स्मिथच्या प्रेस कॉन्फरसचे व्हिडिओ सोशल मीडियामध्ये फार गाजले.
स्टीव्ह स्मिथने आपली चूक मान्य केल्यानंतर प्रेस कॉन्फरन्समध्ये त्याच्या भावनांवर ताबा ठेवू शकला नाही. प्रेस कॉन्फरसमध्ये तो ढसाढसा रडला. यानंतर अनेकांनी क्रिकेटर्स तसेच सेलिब्रिटींनी या प्रकरणी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अभिनेता वरूण धवन म्हणाला,'स्टीव स्मिथचे चाह्ते त्याला माफ करतील. एखाद्या बॅनपेक्षा मानसिक आणि इमोशनल ट्रॉमा अधिक प्रभावी असतो. लवकरत तो परत येईल' अशी आशा त्याने व्यक्त केली आहे.
Watching #stevensmith apologise and look broken is very sad. I’m sure the fans will forgive him . He looks beyond remorseful I hope and pray he will come out of this ordeal a better cricketer. The mental the emotional trauma I’m sure is bigger then Any ban. pic.twitter.com/FsDJcVs8Er
— Varun DAN Dhawan (@Varun_dvn) March 29, 2018
ऑस्ट्रेलियाचे माजी कॅप्टन इयान चॅपल असं वलाटतं की, स्टीव स्मिथला यापुढे राष्ट्रीय संघाच कॅप्टन पद कधीच मिळणार नाही. त्यामुळे आता देशाच्या क्रिकेट बोर्डने असा निर्णय घेतला आहे की स्मिथ आणि डेविड वॉर्नर यांना 1 महिन्यांसाठी बंदी केली आहे. त्यांनी म्हटलं की, मी या दोघांना कॅप्टन पदावर कधीच बघू शकत नाही.
ऑस्ट्रेलिया टीमचा माजी कॅप्टन मायकल क्लार्क यानं या संपूर्ण प्रकरणात कोच डेरेन लेहमन हेदेखील समप्रमाणात दोषी असल्याचं म्हटलंय. 'कोचला या प्रकरणाची माहिती नसेल तर तेही या प्रकरणात तितकेच दोषी आहेत जितके स्टिव स्मिथ आणि टीममधील बाकी खेळाडू' असं क्लार्कनं म्हटलंय.