IPL 2023 MS Dhoni Injury: गतविजेत्या गुजरातने आपला विजयाचा रथ सुरूच ठेवला आहे. पहिल्या सामन्यात (CSK vs GT) पांड्याच्या गुजरातने धोनीच्या सीएसकेला (CSK) पराभवाचं पाणी पाजलं. गुजरात टायटन्सने (GT) सलामीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला पराभूत करत खात्यात दोन अंक जमा केले आहेत. खचाखच भरलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात धोनी (MS Dhoni) काही वेळ अस्वस्थ दिसत होता. एक स्लिपचा कॅच घेताना धोनीच्या पायाला कॅम्प (MS Dhoni injury) आल्याचं दिसून आलं. मात्र, धोनी लगेच सामन्यासाठी तयार झाला. त्यावर आता हेड कोचने (CSK Head Coach) मोठी अपडेट दिली आहे.
गुजरातची बॅटिंग सुरू असताना 19 वी ओव्हर दीपक चहर (Deepak Chahar) टाकत होता. त्यावेळी राहुल तेवतिया दीपकच्या आग ओकणाऱ्या सामना करत होता. तो चेंडू अडवण्यासाठी धोनीने डाईव्ह मारली होती, खरंतर हा चेंडू तेवतियाच्या पॅडला लागून बॉन्ड्रीकडे जात होता. त्यावेळी धोनीने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, धोनीला तो बॉल अडवता आला नाही. धोनी खाली पडला. त्यावेळी त्याच्या पायाला प्रचंड वेदना होत होत्या.
धोनीने स्वत:ला सावरलं आणि उभा राहताना हसला. मात्र, धोनीने मैदान सोडलं नाही. धोनी बराच वेळ लंगडत चालत असल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळे धोनीच्या गुडघ्याला दुखापत झाल्याची चर्चा सुरू होती. त्यावर आता सीएसकेचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी नंतर धोनीच्या फिटनेस आणि दुखापतीबद्दल खुलासा केला आहे.
धोनी नेहमी खेळतच राहणार आहे. त्याच्या दुखापतीची स्टोरी कुठून आली हे माहीत नाही. प्री-सीझनच्या संपूर्ण महिन्यात त्याचा गुडघ्याला दुखत होता. 15 वर्षापूर्वी धोनी जसा चपळ होता, तसा तो आता असणार नाही. अजूनही संघाचा एक उत्कृष्ट लिडर आहे आणि बॅटनेही तो अजूनही एक प्रमुख भूमिका बजावतोय. त्याला त्याच्या मर्यादा आणि जमेची बाजू माहित आहे आणि तो आमच्यासाठी मैदानावर असणारा एक मौल्यवान खेळाडू आहे, असं स्टीफन फ्लेमिंग (Stephen Fleming On MS Dhoni) यांनी सांगितलंय.
आणखी वाचा - PBKG vs KKR: पहिल्याच सामन्यात 'पंजाबची बल्ले बल्ले'; कोलकाताला पाजलं पाणी!
दरम्यान, चेन्नईचा संघ त्यांचा आगामी सामना लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध 3 एप्रिलला (CSK vs LSG) घरच्या मैदानावर खेळणार आहे. त्यामुळे आता माही पुन्हा आपल्या खेळाडूंना घेऊन मैदान मारण्यासाठी तयार आहे. धोनीने मागील सामन्यात एक रेकॉर्ड (MS Dhoni Record) देखील नावावर केलाय. धोनीने आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळताना 200 सिक्सचा टप्पा पूर्ण केला होता. त्यामुळे आता थाला धोनी पुन्हा एकदा तयार असल्याचं पहायला मिळतंय.