Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकचं बिगुल वाजलंय. 26 जुलैपासून 11 ऑगस्टपर्यंत खेळाचा महाकुंभ अर्थात ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत 329 खेळांमध्ये 10,500 खेळाडू सहभागी होणार आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेच्या सुरक्षेसाठी फ्रान्स सरकारने (France Government) जवळपास 20,000 सैनिक आणि 40,000 पोलिस कर्मचाऱ्यांना तैनात केलं आहे. या शिवाय इतर देशांमधून जवळपास 2,000 सैनिक आणि पोलिस कर्मचारी मदतीला असणार आहेत. पॅरिस ऑलिम्पिकसाठी (Paris Olympic) फ्रान्स सरकारने जय्यत तयारी केली आहे.
ऑलम्पिक स्पर्धेचा इतिहास
ऑलिम्पिक स्पर्धेला 1896 साली सुरुवात झाली आणि तेव्हापासून पाच गोलकार रिंग (Olympic Rings) आपण पाहात आलो आहोत. पण या पाच रिंग कशाचं प्रतीक आहे, याचं उत्तर अनेकांना माहित नसेल. वास्तविक पाच रिंगची निर्मिती आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघाचे माजी अध्यक्ष पिएर डू कूबर्टिन यांनी केली होती. हे पाच रिंग जगातील 5 प्रमुख खंडांचे प्रतीक आहेत. आफ्रिका, उत्तर-दक्षिण अमेरिका, आशिया, युरोप आणि ऑस्ट्रेलियन खंड यांचं हे पाच रिंग प्रतिनिधित्व करतात.
पाच रंगाचा अर्थ काय?
ऑलिम्पिक स्पर्धेच प्रतिक असलेल्या या पाच गोलाकार रिंग पाच रंगात आहेत. यात निळा, पिवळा, काळा, हिरवा आणि लाल रंगाचा समावेश आहे. या पाच रिंगांच्या मागे पांढऱ्या रंगाची बॅकग्राऊंड आहे. हे पाच रंग यासाठी घेण्यात आले आहे, कारण या रंगात जगातल्या जवळपास सर्व देशांच्या झेंडाचा रंग येतो. सर्व देशांची एकता आणि अखंडता राखण्यासाठी या 5 रंगांचा वापर करण्यात आला. ही पाच रिंग जगभरातून खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी येणाऱ्या खेळाडूंचंही प्रतिनिधित्व करतात.
भारतीय खेळाडूंचं पथक
पॅरिस ऑलिम्पिकसाठी (Paris Olympic) भारताचं (India) 117 खेळाडूंचं पथक पाठवण्यात आलं आहे. यात दोनवेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या पी व्ही सिंधु (PV Shindhu) आणि 2020 टोकिया ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेत्या नीरज चोप्राचा (Neeraj Chopra) समावेश आहे. अॅथलेटिक्ससाठी एकूण 29 खेळाडू असून यात 11 महिला आणि 18 पुरुष खेळाडूंचा समावेश आहे. नेमबाजीत 21, हॉकी 19 खेळाडूंचा समावेश आहे. टेबलटेनिस 8, बॅडमिंटन 7, कुस्ती 6, तिरंदाजी 6 आणि बॉक्सिंगमध्ये 6 खेळाडूंचा समावेश आहे. याशिवाय गोल्फ 4, टेनिस 3, स्विमिंग 2, सेलिंगमध्ये 2 खेळाडू आहेत. घोडेस्वारी, ज्युडो, रोईंग आणि वेटलिफ्टिंगसाठी प्रत्येकी एका खेळाडूचा समावेश आहे.