घटस्फोटानंतर नताशाची पहिली पोस्ट, हार्दिक पांड्यासाठी गुड न्यूज

Hardik-Natasa : टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आणि पत्नी नताशा स्टेनकोविकने अधिकृतरित्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब केलं आहे. दोघांनी सामंजस्याने हा निर्णय घेतलाय. नताशा मुलगा अगस्त्याला घेऊन आपल्या मायदेशी म्हणजे सर्बियाला परतली आहे. 

राजीव कासले | Updated: Jul 19, 2024, 05:19 PM IST
 घटस्फोटानंतर नताशाची पहिली पोस्ट, हार्दिक पांड्यासाठी गुड न्यूज title=

Natasa Stankovic First Post after separation Announcing :  टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि पत्नी नताशा स्टेनकोविकने (Natasa Stankovic) अधिकृतरित्या घटस्फोटावर (Divorce) शिक्कामोर्तब केलं आहे. 18 जुलै 2024 रोजी हार्दिक पांड्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं. याच्या एकदिवस आधीच नताशा मुलगा अगस्त्यला (Agastya) घेऊन आपल्या मायदेशी म्हणजे सर्बियाला परतली. आता घटस्फोटानंतर नताशाने पहिल्यांदा पोस्ट शेअर केली आहे. 

टी20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या आधीपासून हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनकोविकच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा रंगली होती. अनंत अंबानीच्या लग्नातही हार्दिक एकटाच दिसला होता. इतकंच काय तर टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतरही नताशाने हार्दिकसाठी एकही पोस्ट शेअर केली नव्हती. तेव्हाच दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याची कुणकुण सर्वांना लागली होती. पण हार्दिक किंवा नताशाने आपल्या नात्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आता गुरुवारी हार्दिकने मोठी पोस्ट टाकत अधिकृत वेगळं होत असल्याची घोषणा केली.

हार्दिक-नताशात 'का रे दुरावा'
हार्दिक आणि नताशा चार वर्षांपासून नात्यात होते. हा निर्णय घेणं इतकं सोप नव्हतं असं नताशाने म्हटलंय. पण हार्दिकबरोबर सामंजस्याने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. लग्नाची चार वर्ष आयुष्यात खूपच खास होती, आता पुढे अगस्त्यचा सांभाळ दोघंही करु असं म्हणत नताशाने मुलाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मुलाचे फोटो पाहून हार्दिक पांड्याला नक्कीच आनंद होईल. 

घटस्फोटानंतर पहिली पोस्ट
घटस्फोटानंतर नताशा स्टेनकोविकने पहिली पोस्ट शेअर केली आहे. यात तीने आपला चार वर्षांचा मुलगा अगस्तचे फोटो टाकले आहेत. फोटो खाली तीने 'हॅप्पी बर्थ डे, सदैव सुखी राहा' असं म्हटलं आहे.  याबरोबरच तीने अगस्तचा एक व्हिडिओही शेअर केला आहे. 

हार्दिक-नताशाचा लग्न
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनकोविकने 31 मे 2020 मध्ये लग्न केलं. राजस्थानच्या उदयपूरमध्ये शाही थाटात हा विवाह सोहळा पार पडला. हिंदू आणि ख्रिश्चन परंपरेप्रमाणे या दोघांनी लग्न केलं होतं. 30 जुलै 2020 रोजी नताशा आणि हार्दिकच्या आयुष्यात मुलगा अगस्त्या याचं आगमन झालं.