दक्षिण आफ्रिका - टेस्ट सीरिजसाठी आज टीम इंडियाची निवड

हार्दिक पंड्या आणि भुवनेश्वर कुमारचं या टेस्ट सीरिजसाठी कमबॅक होण्याची शक्यता आहे. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Nov 27, 2017, 02:00 PM IST
दक्षिण आफ्रिका - टेस्ट सीरिजसाठी आज टीम इंडियाची निवड title=

मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी टीम इंडियाची निवड आज होणारी आहे. या टेस्ट सीरिजसाठी टीम इंडियामध्ये कुणाची वर्णी लागणार याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष असणार आहे. हार्दिक पंड्या आणि भुवनेश्वर कुमारचं या टेस्ट सीरिजसाठी कमबॅक होण्याची शक्यता आहे. 

काहींचा कमबॅक होण्याची शक्यता

लंकेच्या टीमसाठी बॅकअप असलेल्या विजय शंकरच्या नावाचाही पुन्हा विचार होऊ शकतो. त्याचप्रमाणे दक्षिण आफ्रिकेच्या या महत्त्वाच्या दौऱ्यासाठी एखाद्या नव्या चेह-यालाही संधी मिळते का ते पाहण महत्त्वाचं ठरणार आहे. 

दौऱ्यात तीन टेस्ट

भारतीय टीम या दौऱ्यात तीन टेस्ट, सहा वन-डे आणि तीन टी-20 मॅचेस खेळणार आहे. 5 जानेवारीपासून केपटाऊन टेस्टपासून टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिकन दौऱ्याला सुरुवात होणार आहे.