LIVE SCORE दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये

भारताविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला आहे.

Updated: Jan 16, 2018, 04:19 PM IST
LIVE SCORE दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये  title=

सेंच्युरिअन : भारताविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. चौथ्या दिवसाच्या लंचपर्यंत दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर १७३/५ आहे. व्हर्नन फिलँडर ३ रन्सवर तर फॅप डुप्लेसिस १२ रन्सवर खेळतोय. पहिल्या इनिंगमध्ये मिळालेल्या २८ रन्सच्या आघाडीमुळे आफ्रिकेची आघाडी आता २०० रन्सच्या पार गेली आहे.

चौथ्या दिवसाची सुरुवात ९०/२ अशी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला आज तीनही धक्के मोहम्मद शमीनं दिले. शमीनं डीन एल्गारला ६१ रन्सवर, एबी डिव्हिलियर्सला ८० रन्सवर आणि क्विंटन डीकॉकला १२ रन्सवर ऑल आऊट केलं. त्याआधी म्हणजेच काल जसप्रीत बुमराहनं दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या दोन्ही बॅट्समनना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं होतं.

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा