South Africa vs Sri Lanka : साऊथ अफ्रिकने रचला इतिहास! उभारला वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वात मोठा स्कोर

South Africa Cricket team : वर्ल्ड कपच्या एकाच इनिंगमध्ये 59 फोर मारले गेले आहेत. वर्ल्ड कपच्या इतिहासातील 200 वं शतक मार्करमच्या (Aiden Markram) बॅटमधून निघालं आहे.

Updated: Oct 7, 2023, 06:47 PM IST
South Africa vs Sri Lanka : साऊथ अफ्रिकने रचला इतिहास! उभारला वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वात मोठा स्कोर title=
South Africa vs Sri Lanka cwc 2023

South Africa vs Sri Lanka : सर्वांना प्रतिक्षा लागून राहिलेल्या वर्ल्ड कपला आता धमाकेदार अंदाजात सुरूवात झाली आहे. वर्ल्ड कपचा (World Cup 2023) तिसरा सामना साऊथ अफ्रिका अन् श्रीलंका यांच्यात खेळण्यात आला होता. या सामन्यात साऊथ अफ्रिकन संघाने (South Africa) विविध रेकॉर्ड नावावर केले आहेत. वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या (highest score in world cup) साऊथ अफ्रिकन संघाने उभी केली आहे. त्यामुळे श्रीलंकन गोलंदाजांच्या तोंडचं पाणी पळालंय. या सामन्यात नेमके कोणते रेकॉर्ड मोडले गेलेत पाहुया...

ऑस्ट्रेलियाने 2015 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध 417 धावा कुटल्या होत्या. आता हा रेकॉर्ड साऊथ अफ्रिकन संघाने मोडून काढला आहे. साऊथ अफ्रिकेने (South Africa vs Sri Lanka) श्रीलंकेविरुद्ध 428 धावांचं डोंगर उभा केला. त्याचबरोबर वर्ल्ड कपच्या एकाच इनिंगमध्ये 59 फोर मारले गेले आहेत, हा देखील एक रेकॉर्ड झालाय. त्याचबरोबर वर्ल्ड कपच्या इतिहासातील 200 वं शतक एडम मार्करमच्या (Aiden Markram)  बॅटमधून निघालं आहे. एकाच इनिंगमध्ये 3 शतक ठोकल्याचा इतिहास देखील रचला गेला आहे. याआधी कोणत्याही संघाला अशी कामगिरी करता आली नव्हती. 

प्रथम गोलंदाजी करताना साऊथ अफ्रिकेची सुरूवात खराब झाली. कॅप्टन टेम्बा बावुमा लवकर बाद झाला. त्याने फक्त 8 धावा केल्या. त्यानंतर क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) आणि रॅसी व्हॅन डर डुसेन (Rassie van der Dussen) यांनी सावध खेळी केली अन् दोघांनीही शतक झळकावलं. क्विंटन डी कॉक याने 100 धावा केल्या तर रॅसी व्हॅन डर डुसेन याने 108 धावांची खेळी केली. त्यानंतर एडम मार्करमने दिल्लीच्या मैदानात वादळ उटवलं. त्यानंतर उर्वरित काम डेव्हिड मिलरने पूर्ण केलंय.

साऊथ अफ्रिका : क्विंटन डी कॉक (WK), टेम्बा बावुमा (C), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा.

श्रीलंका : कुसल परेरा, पाथुम निसांका, कुसल मेंडिस (WK), सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, दासुन शनाका (C), दुनिथ वेललागे, मथीशा पाथिराना, दिलशान मदुशंका, कसून राजिथा.