Aiden Markram Century : वर्ल्ड कप सुरू झाला अन् चर्चा सुरू झाली भारत आणि ऑस्ट्रेलियाची... दोन्ही संघ वर्ल्ड कप जिंकतील, असं प्रत्येकजण म्हणत होतं. मात्र, या सर्व चर्चेत हारवलेला संघ होता साऊथ अफ्रिका (South Africa). क्विंटन डी कॉक, रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम (Aiden Markram), डेव्हिड मिलर, कागिसो रबाडा यांसारख्या तगड्या खेळाडूंच्या या संघाला सर्वांनी नजरेआड केलं होतं. मात्र, वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात (South Africa vs Sri Lanka) साऊथ अफ्रिकेने दम दाखवून दिलाय. श्रीलंकेविरुद्ध साऊथ अफ्रिकेने डोंगराएवढ्या धावा उभ्या केल्या अन् श्रीलंकेच्या तोंडचं पाणी पळवलं. या सामन्यात खास ठरली ती एडम मार्करमची इनिंग...
एडम मार्करमने फक्त 49 बॉलमध्ये आपलं शतक पूर्ण केलं. त्याचबरोबर वर्ल्ड कपमधील सर्वात वेगवान शतक ठरलं आहे. 14 फोर अन् 3 गगनचुंबी षटकार खेचत मार्करमने प्रेक्षकांचा पैसा वसूल केला. 196 च्या स्टाईक रेटने मार्करमने श्रीलंकाच्या गोलंदाजांची धुलाई केली. तर श्रीलंकेचा स्टाईक बॉलर पथिराना याला मार्करमने एकाच ओव्हरमध्ये धुतलं. ती ओव्हर खऱ्या अर्थाने खास ठरली.
Aiden Markram against Matheesha Pathirana - 4,4,4,4,2,6.
Madness from Markram! pic.twitter.com/AS1uTxiuTx
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 7, 2023
दरम्यान, प्रथम गोलंदाजी करताना कॅप्टन टेम्बा बावुमा लवकर बाद झाला. त्याने फक्त 8 धावा केल्या. त्यानंतर क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) आणि रॅसी व्हॅन डर डुसेन (Rassie van der Dussen) यांनी सावध खेळी केली अन् दोघांनीही शतक झळकावलं. क्विंटन डी कॉक याने 100 धावा केल्या तर रॅसी व्हॅन डर डुसेन याने 108 धावांची खेळी केली. त्यानंतर एडम मार्करमने दिल्लीच्या मैदानात वादळ उटवलं.
साऊथ अफ्रिका : क्विंटन डी कॉक (WK), टेम्बा बावुमा (C), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा.
श्रीलंका : कुसल परेरा, पाथुम निसांका, कुसल मेंडिस (WK), सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, दासुन शनाका (C), दुनिथ वेललागे, मथीशा पाथिराना, दिलशान मदुशंका, कसून राजिथा.