द. आफ्रिका ३३५ रनवर ऑलआऊट, भारताची खराब सुरुवात

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ३ सामन्याच्या टेस्ट सिरीजचा दुसरा सामना सुरु आहे. मॅचच्या दुसऱ्या दिवशी भारतीय टीमने दक्षिण आफ्रिकेला 335 रनवर ऑलआऊट केलं आहे. 

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 14, 2018, 05:00 PM IST
द. आफ्रिका ३३५ रनवर ऑलआऊट, भारताची खराब सुरुवात title=

सेंचुरियन : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ३ सामन्याच्या टेस्ट सिरीजचा दुसरा सामना सुरु आहे. मॅचच्या दुसऱ्या दिवशी भारतीय टीमने दक्षिण आफ्रिकेला 335 रनवर ऑलआऊट केलं आहे. 

भारतीय टीमकडून आर. अश्विनने 4 आणि इशांत शर्माने 3 विकेट घेतले. अश्विनने डीन एल्गरला 31 रनवर आऊट केलं. तर एडेन मार्करमला 94 रनवर आऊट केलं. मार्करम आपलं शतक पूर्ण करु नाही शकला. मार्करमने 150 बॉलमध्ये 15 फोर लगावत 94 रन केले.

ईशांत शर्माने दक्षिण आफ्रिकेला तिसरा झटका दिला. ईशांतने डिविलियर्सला 20 रनवर आऊट केलं. हार्दिक पंड्याने हाशिम अमलाला 82 रनवर आऊट करत चौथा झटका दिला. यानंतर क्रीजवर आलेला क्विंटन डी कॉक 0 रनवर आऊट झाला. अश्विनच्या बॉलवर विराट कोहलीने त्याचा कॅच घेतला. डी कॉकनंतर वर्नोन फिलेंडर देखील 0 रनवर आऊट झाला.

भारताला २८ रनवर एकामागे एक २ झटके लागले. भारतीय टीमचा ओपनर केएल राहुल 10 रनवर तर पुजारा 0 रनवर आऊट झाला आहे.