मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून विराट कोहली अत्यंत वाईट फॉर्ममध्ये आहे. विराटसोबत रोहित शर्माही वाईट फॉर्ममध्ये आहे. दोघंही टी 20 वर्ल़्ड कपआधी चांगल्या फॉर्ममध्ये यावेत यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.
रोहित शर्माने आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 125 च्या स्ट्राईक रेटने 218 धावा केल्या आहेत. एकवेळा शून्यवर आणि नंतर कमी धावा करून आऊट झाला आहे. मुंबईकडून खेळताना यंदाच्या हंगामात एकही अर्धशतक करण्यात त्याला यश मिळालं नाही.
मुंबई आधीच प्लेऑफमधून बाहेर गेली आहे. आता रोहित शर्मा त्याच्या खराब फॉर्ममुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. विराट कोहलीच्या पावलावर पाऊल रोहित शर्मा ठेवत असल्याचं दिसत आहे.
‘मिड-डे’शी बोलताना गांगुली म्हणाला, ‘विराट-रोहितच्या फॉर्मची मला अजिबात चिंता नाही. टी 20 वर्ल्ड कपला खूप जास्त अवकाश आहे. या स्पर्धेआधी दोघंही चांगल्या फॉर्ममध्ये येतील असा विश्वास सौरव गांगुली यांनी व्यक्त केला. येणाऱ्या काळात दोघंही चांगलं खेळताना दिसतील याचा विश्वास आहे.
सध्यातरी या दोघांच्या बॅटमधून धावा निघत नसल्याने टीम इंडियासाठी धोक्याची घंटा आहे. टी 20 वर्ल्ड कपसाठीचे सामना भारत कसा जिंकणार याचं टेन्शन आहे. त्यामुळे रोहित आणि विराटच्या कामगिरीकडे लक्ष आहे.