भारतीय कुटुंबासाठी परफेक्ट कार; पॅनोरमिक सनरुफसह Kia Syros मधून मिळणार प्रवासाचा दमदार अनुभव

Kia Syros Price features Design : नव्या वर्षात नवी कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर काही नवे पर्यायही विचारात घ्या. पाहा या कारचे फिचर्स तुमच्या अपेक्षा पूर्ण करतायत का...   

सायली पाटील | Updated: Dec 19, 2024, 02:41 PM IST
भारतीय कुटुंबासाठी परफेक्ट कार; पॅनोरमिक सनरुफसह Kia Syros मधून मिळणार प्रवासाचा दमदार अनुभव  title=
Kia Syros SUV Launched in watch Price features Design Specifications Images

Kia Syros Price features Design : मागील काही वर्षांमध्ये भारतात वर्षानुवर्षांपासून प्रकाशझोतात असणाऱ्या कार ब्रँडसोबतच आणखीही काही ब्रँडना कमालीची लोकप्रियता मिळाली. त्यातलाच एक ब्रँड म्हणजे, किआ. मूळच्या दक्षिण कोरिआई किआ ब्रँडच्या अनेक कारना भारतीयांनी कमाल पसंती दिली. त्यातच आता ही कंपनी एका नव्या मॉडेलसह भारतीय बाजारपेठेत पुन्हा एकदा दमदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झाली आहे. या नव्या मॉडेलचं नाव आहे किआ सिरोस (KIA Syros). 

कंपनीनं नुकतीच KIA Syros ही कार लाँच केली असून, ही एक B सेग्मेंट एसयुव्ही असल्याचं म्हटलं जात आहे. सेल्टॉस आणि सॉनेट या दोन कारच्या मध्येच ही कार ग्राहकांची पसंती असेल असं म्हटलं जात आहे. भारतीय ऑटो क्षेत्रामध्ये या कारला टाटा पंट, नेक्सन, मारुती ब्रेझा, ह्युंडई एक्सटर अशा मॉडेलची टक्कर असेल. 

कंपनीकडून सध्या फक्त या मॉडेचं अनावरण करण्यात आलं असून, त्याची किंमत मात्र जाहीर करण्यात आलेली नाही. 2025 च्या पहिल्याच महिन्यात अर्थात जानेवारीमध्ये भारत मोबिलिटी एक्स्पोमध्ये या कारची किंमत जाहीर केली जाणार असून, फेब्रुवारीपासून तिची डिलीव्हरी मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 

कारचा लूक आणि डिझाईन 

KIA Syros कारला दमदार फ्रंट लूक देण्यात आला असून, हाय सेट बोनस इथं जमेची बाजू ठरत आहे. शिवाय कारमध्ये मोठे एलईडी लाईट आणि वर्टिकल एलईडी हेडलाईटही देण्यात आले आहेत. कारच्या बम्परमध्ये फॉक्स स्किड प्लेटसाठी सिल्व्हर एलिमेंट आणि अॅडवान्स ड्रायविंग असिस्टंन्स सिस्टीम (ADAS) साठीचं रडार मॉड्युलही पाहायला मिळतं. 

फ्लश डोअर हँडल, चंकी बी पिलर, ब्लॅक बॉडी क्लॅडिंगसह कारला 17 इंच अलॉय व्हील्स देण्यात आले असल्याचं सांगितलं जात आहेय. प्रथमदर्शनी ही कार पाहताक्षणी मारुतीच्या वॅगनआरचीही आठवण होऊ शकते. 

KIA Syros ही कार पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही इंजिन व्हेरिएंटसह सादर करण्यात आली असून, यामध्ये 1.5 लीटर डिझेल इंजिन देण्यात आलं आहे. ज्यातून 115 bhp पॉवर आणि 250 Nm टॉर्क जनरेट करता येतो. पेट्रोल ऑप्शनमध्ये या कारला 1.0 लीटरचं टर्बो इंजिन देण्यात आलं असून, त्यातून 120 bhp इतकी पॉवर जनरेट होते. या कारला 6 स्पीड मॅन्युअल आणि 7 स्पीड डीसीटी, 6 स्पीड टॉर्क कन्वर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गिअरबॉक्ससह सादर करण्यात येत आहे. 

हेसुद्धा वाचा : वेळच अस्तित्वात नसलेली पृथ्वीवरील जागा! घड्याळबंदीची स्थानिकांनी केलेली मागणी; निसर्गसौंदर्य एकदा पाहाच

कारचं केबिनही आलिशान असून, यामध्ये 30 इंचांचा पॅनोरमिक स्क्रीन सेटअप देण्यात आलं आहे. शिवाय कारला गडद रंगाच्या थीमनं सजवण्यात आलं आहे. किआच्या या एसयुव्हीमध्ये मागे- पुढे वेंटिलेटेड सीट, पॅनोरमिक सनरुफ, पॉवर्ड ड्रायव्हर सीट, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, प्रिमियम ऑडिओ सिस्टीम, एम्बिएंट लायटींगसह हिल होल्ड असिस्ट, 360 डिग्री कॅमेरा, स्पीड अलार्म सिस्टीम, रिअर पार्किंग सेन्सर असे आवश्यक फिचरही देण्यात आले आहेत. कुटुंबासाठी खिशाला परवडणारी आणि सर्व फिचर्सनं परिपूर्ण असणारी कार खरेदी करायचा विचार करत असाल तर हा एक उत्तम पर्याय ठरेल असं म्हणणं गैर ठरणार नाही.