"काही तासचं उरले आहेत...", Video पोस्ट करत असं का म्हणाले Sourav Ganguly?

Saurav Ganguly : सौरव गांगुली यांनी अचानक असा व्हिडीओ का शेअर केला आहे. त्या मागचं कारण काय? याविषयी आता ते जेव्हा पुढे काही सांगतिल तेव्हाच माहिती मिळेल. पण दुसरीकडे त्यांचे चाहते सोशल मीडियावर कमेंट करत नक्की काय आहे अशी पोस्ट का केली असा सवाल करत आहेत. 

दिक्षा पाटील | Updated: Jul 7, 2023, 04:37 PM IST
"काही तासचं उरले आहेत...", Video पोस्ट करत असं का म्हणाले Sourav Ganguly?  title=
(Photo Credit : Social Media)

Saurav Ganguly : भारतीय क्रिकेट टीमचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांचा उद्या 8 जुलै रोजी वाढदिवस आहे. उद्या त्यांचा वाढदिवस असताना सौरव यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना आतुरता लागली आहे की सौरव गांगुली उद्या खूप मोठी घोषणा करणार आहेत. नेमकं हे काय आहे त्याविषयी नक्की इतकं बिल्ट अप का करण्यात आलं याविषयी त्यांचे चाहता विचारणा करत आहेत. 

सौरव गांगुली यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सौरव गांगुली यांनी त्यांचा क्रिकेटमधील संपूर्ण प्रवास दाखवला आहे. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला आशाएं  हे गाणं सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, सगळ्यांचे लक्ष सौरव गांगुली यांनी दिलेल्या कॅप्शननं वेधलं आहे. सौरव यांनी हा व्हिडीओ शेअर करत तुम्ही दिलेला पाठिंबा आणि प्रेम आम्हाला आणखी मेहनत करण्यासाठी प्रोत्साहित करतं. आता काहीच तास उरले आहेत... सौरव यांचं हे ट्वीट पाहिल्यानंतर त्यावर कमेंट करत नेटकऱ्यांनी नक्की असं काय आहे उद्या असा सवाल केला आहे. तर काही नेटकऱ्यांनी काही मोठी घोषणा करणार आहे की काय असा सवाल केला आहे. 

दरम्यान, उद्या सौरव यांच्यावर बायोपिक बनवण्याची घोषणा काही काळापूर्वी करण्यात आली होती. त्याचे निर्मिती ही लव फिल्म्स करणार असल्याचे सांगण्यात आले होते. खरंतर सौरव हे गेल्या चार-पाच वर्षांपासून त्यांच्या बायोपिकमुळे चर्चेत होते. आता या चित्रपटाची पटकथा तयार झाली आहे, असे काही दिवसांपूर्वी म्हटले जात होते. तर 24 जानेवारी रोजी या चित्रपटाची स्क्रिप्ट सौरव गांगुली यांनी फायनल केल्याच्या चर्चा होत्या. तर या चित्रपटाच्या शूटिंगला यंदाच्या वर्षाच्या शेवटी सुरुवात होणार असल्याचे म्हटले जाते. 

चित्रपटात सौरव गांगुली यांची भूमिका रणबीर कपूर साकारणार असल्याचे म्हटले जात होते. त्यामुळे महेंद्र सिंग धोनी आणि सचिन तेंडुलकर प्रमाणे आता सौरव गांगुलीची देखील बायोपिक पाहायला मिळणार आहे. दरम्यान, या चित्रपटात महेंद्र सिंग धोनीची भूमिका देखील या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय या चित्रपटात इतर क्रिकटर्सच्या भूमिकेत कोणते कलाकार असणार आहेत, याविषयी अजून काही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे सौरव उद्या त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं चित्रपटाची घोषणा करणार का? असा प्रश्न चाहत्यांच्या समोर उभा राहिला आहे. या चित्रपटाचा बजेट हा 250 कोटी असेल असे म्हटले जात आहे.