सौरव गांगुलीकडून चूक, हरभजनची मागितली माफी

भारताचा सगळ्यात यशस्वी कर्णधार आणि दिग्गज ऑफ स्पिनर हरभजन सिंग कित्येक वर्ष एकत्रच भारतासाठी क्रिकेट खेळले. 

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Nov 21, 2017, 04:29 PM IST
सौरव गांगुलीकडून चूक, हरभजनची मागितली माफी  title=

मुंबई : भारताचा सगळ्यात यशस्वी कर्णधार आणि दिग्गज ऑफ स्पिनर हरभजन सिंग कित्येक वर्ष एकत्रच भारतासाठी क्रिकेट खेळले. सौरव गांगुलीमुळेच आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यशस्वी झाल्याचं हरभजननं कित्येकवेळा कबूल केलं आहे. आता सौरव गांगुली निवृत्त होऊन आणि हरभजन टीम बाहेर राहून बराच काळ लोटला आहे.

पण आता सौरव गांगुलीला हरभजनची माफी मागावी लागली आहे. ट्विटरवर हरभजन सिंगनं पोस्ट केलेल्या फोटोवरूनव गांगुलीचा गैरसमज झाला. ही चूक लक्षात आल्यावर गांगुलीनं हरभजनची माफी मागितली.

हरभजननं सोमवारी सुवर्ण मंदिरातला बायको गीता बसरा आणि मुलीसोबतचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला. सौरव गांगुलीनं हरभजनच्या या फोटोला शुभेच्छा देताना गडबड केली. मुलगा खूप सुंदर आहे भज्जी. त्याच्यावर खूप प्रेम करं, असं रिप्लाय गांगुलीनं दिला. पण हरभजनला मुलगी असल्याचं लगेचच गांगुलीच्या लक्षात आलं आणि त्यानं लगेच माफी मागितली आणि मुलगी सुंदर असल्याचं दादा म्हणाला.