मुंबई : लोढा समितीच्या काही शिफारशींवर राज्य संघटनांनी आक्षेप नोंदवला होता. त्याचा अभ्यास करण्यासाठी आणि समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी बीसीसीआयनं सात सदस्यीय समितीची स्थापन केली आहे.
या समितीचं अध्यक्षपद हे राजीव शुक्लांकडे सोपवण्यात आलंय. त्याचप्रमाणे भारताचा माजी कॅप्टन सौरव गांगुली, केरळ क्रिकेटचे टीसी मॅथ्यू, पूर्व विभागाचे ए. भट्टाचार्य, गुजरात क्रिकेट असोसिएशनचे जय शाह, बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी आणि बीसीआयचे प्रभारी सचिव अमिताभ चौधरी या समितीचे सदस्य आहेत.
याप्रकरणी १४ जुलैला सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी होईल. त्यापूर्वी या समितीला बैठक घेण्यास सांगण्यात आलंय. त्याचप्रमाणे १० जुलैपूर्वी आपला अहवाल सादर करण्यासही सांगण्यात आलंय.