मुंबई : बीसीसीआयचे प्रमुख सौरव गांगुली विराट कोहलीसोबतच्या वादानंतर बरेच चर्चेत राहिले. BCCI अध्यक्षपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर गांगुली यांना अनेक टीकांचा सामना करावा लागलाय. यावेळी क्रिकेटसाठी फारसं काही न केल्याचा आरोप देखील त्यांच्यावर करण्यात आला. मात्र आता सौरव गांगुली यांनी या सर्व आरोपांना उत्तर दिलंय.
बीसीसीआयचे प्रमुख सौरव गांगुली यांनी त्यांच्यावरील आरोपांना उत्तर म्हटलंय, मला काहीही उत्तर देण्याची गरज आहे असं वाटत नाही. मी बीसीसीआयचा अध्यक्ष आहे आणि बीसीसीआयच्या अध्यक्षांनी जे करावं तेच मी करतोय."
मी एक फोटो सोशल मीडियावर पाहतोय आहे ज्यामध्ये मी निवड समितीच्या बैठकीत बसलोय. मी स्पष्ट करू इच्छितो की, तो फोटो निवड समितीच्या बैठकीचा नव्हता. जयेश जॉर्ज निवड समितीच्या बैठकीचा भाग नसतो, असंही गांगुली यांनी सांगितलंय.
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली पुढे म्हणाले की, "आम्ही महिला आयपीएल खेळवणार आहोत. मला विश्वास आहे की, पुढचं वर्ष म्हणजे महिला आयपीएल सुरू करण्यासाठी 2023 हा खूप चांगला काळ असेल. जे पुरुषांच्या आयपीएलइतकेच मोठं आणि यशस्वी असेल."
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन T-20 सामन्यांच्या मालिकेसाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये परवानगी देण्यात आलेली नाही. फक्त CAB अधिकारी आणि विविध युनिट्सच्या प्रतिनिधींना परवानगी असेल. राज्य सरकारची मान्यता आहे पण बीसीसीआयला खेळाडूंच्या सुरक्षेचा धोका पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे.