Suryakumar Yadav On Playing XI : भारत आणि श्रीलंका यांच्यात तिसरा सामना पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. या सामन्यात विजय मिळवून लाज राखण्याचं आव्हान श्रीलंकेसमोर असेल तर मालिका विजयानंतर श्रीलंकेला क्लिन स्विप देण्याचा प्रयत्न टीम इंडियाचा असणार आहे. अशातच आता तिसऱ्या टी-ट्वेंटी सामन्याआधी सूर्यकुमार यादव तीन खेळाडूंना टीममधून बाहेर बसवण्याची शक्यता आहे. सूर्यकुमार यादव कोणत्या खेळाडूंबाबत असा निर्णय घेणार? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.
श्रीलंकेविरुद्ध आता फक्त एक सामना बाकी आहे. तीन सामन्यातील दोन सामन्यात टीम इंडियाने विजयी पतका फडकवला. अशातच आता एका उर्वरित सामन्यात सूर्यकुमार यादव तीन खेळाडूंना बेंचवर बसवून तीन युवा खेळाडूंनी संधी देण्याच्या तयारीत आहे. सूर्यकुमार यादव तिसऱ्या सामन्यात वॉशिंग्टन सुंदर, खलील अहमद, शिवम दुबे यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये घेऊ शकतो. स्कॉडमधील या तिन्ही खेळाडूंनी श्रीलंकेविरुद्ध एकही सामना खेळला नाहीये.
वॉशिंग्टन सुंदर, खलील अहमद, शिवम दुबे या तिघांना प्लेईंग इलेव्हनमध्ये घेयचं असेल तर तिघांना बेंचवर बसावं लागेल. त्यामुळे संजू सॅमसन, रिंकू सिंग आणि हार्दिक पांड्या यांना आराम दिला जाण्याची शक्यता आहे. संजूला एका सामन्यात संधी मिळाली, परंतू तो पहिल्याच बॉलवर बाद झाला. तसेच रिंकू सिंगला देखील दोन सामन्यात खास कामगिरी करता आली नाहीये. त्यामुळे आता सूर्या कोणाला नारळ देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करणार का? असा प्रश्न जेव्हा दुसऱ्या सामन्यानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये सूर्याला प्रश्न विचारला गेला, तेव्हा आम्ही याबाबत बसून निर्णय घेऊ, असं सूर्याने उत्तर दिलं होतं. त्यामुळे गौतम गंभीर आणि सूर्याच्या निर्णयावर सर्वांचं लक्ष असेल.
टी-20 मालिकेसाठी श्रीलंका टीम: चरिथ असलंका (कॅप्टन), पथुम निसांका, कुसल परेरा ,अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, दिनेश चांदिमल, कामिंदु मेंडिस, दासुन शनाका, वानिंदु हसरंगा, दुनिथ वेल्लालागे ,महेश तीक्षाना,चामिंडु विक्रमसिंघे, मथीशा पथिराना, बिनुरा फर्नांडो, दिलशान मधुशंका आणि असिथा फर्नांडो.
टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.