Sri Lanka vs Bangladesh : बांगलादेश संघाने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत इतिहास रचला आहे. पराभवाची परंपरा मोडूस काढून त्यांनी प्रथमच विश्वचषकात श्रीलंकेचा पराभव केला. हा सामना बांगलादेशने 3 गडी राखून जिंकला. मात्र, संपूर्ण सामना वादात सापडल्याचं पहायला मिळालं. श्रीलंकेचा ऑलराउंडर अँजलो मॅथ्यूज (Angelo mathews) याची विकेट टाईम आऊट या नियमामुळे गेली. बांगलादेशचा कॅप्टन शाकिब अल हसन (shakib al hasan) याने टाईम आऊटसाठी अपिल केली होती. त्यामुळे मॅथ्यूज देखील नाराज झाल्याचं पहायला मिळालं. मात्र, बांगलादेशच्या डावात मॅथ्यूजने बदला घेतला.
श्रीलंकेने दिलेल्या 280 धावांचं आव्हान पार करताना बांगलादेशची सुरूवात चांगली झाली नाही. तन्झिद हसन आणि लिटॉन दास हे दोन्ही सलामीवीर तंबूत परतले. त्यानंतर मात्र, कॅप्टन शकिब अल हसन आणि नजमुल हुसेन शांतो यांना डाव सावरला. दोघांनी बांगलादेशला विजयाच्या उंभरठ्यावर आणून ठेवलं. त्याचवेळी सामन्याच्या 32 व्या ओव्हरमध्ये मॅथ्यूज गोलंदाजीला आला अन् ओव्हरच्याच दुसऱ्या बॉलवर मॅथ्यूजने नियम शिकवणाऱ्या शकिबची विकेट काढली.
दरम्यान, सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेच्या संघाने 280 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात बांगलादेशी संघाने 7 विकेट्स गमावून सामना जिंकला. संघाकडून नजमुल हुसेन शांतोने ९५ धावांची खेळी केली. तर कर्णधार शकिब अल हसनने 82 धावा केल्या. शाकिब आणि शांतो यांनी तिसर्या विकेटसाठी 149 चेंडूत 169 धावांची खेळी केली. त्यामुळे शाकिब अल हसनला प्लेयर ऑफ द मॅचचा अवॉर्ड देण्यात आला.
बांगलादेश प्लेईंग ईलेव्हन | शकिब अल हसन (कॅप्टन), तन्झिद हसन, लिटॉन दास, नजमुल हुसेन शांतो, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महमुदुल्ला, तॉहिद हृदोय, मेहदी हसन मिराझ, तन्झिम हसन साकिब, तस्किन अहमद आणि शोरीफुल इस्लाम.
श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | कुसल मेंडिस (कॅप्टन आणि विकेटकीपर), पथुम निसांका, कुसल परेरा, सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, महेश तीक्षना, दुष्मंथा चमीरा, कसून रजिथा आणि दिलशान मदुशंका.