Time Out Wicket : मॅथ्यूजविरुद्ध टाईम आऊटची अपिल का केली? शाकिब अल हसनने स्पष्टच सांगितलं...

Shakib Al Hasan On Time Out Wicket : सामना झाल्यानंतर बांगलादेश आणि श्रीलंकेच्या खेळाडूंनी हातमिळवणी (शेकहँड्स) देखील केली नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने सामना वादग्रस्त आणि लज्जास्पद राहिला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 

सौरभ तळेकर | Updated: Nov 6, 2023, 10:52 PM IST
Time Out Wicket : मॅथ्यूजविरुद्ध टाईम आऊटची अपिल का केली? शाकिब अल हसनने स्पष्टच सांगितलं... title=

Angelo Mathews Wicket controversy : दिल्लीच्या मैदानावर झालेल्या श्रीलंका आणि बांगलादेश (Bangladesh vs Sri Lanka) यांच्यातील सामना खऱ्या अर्थाने ऐतिहासिक आणि अनाकलनिय राहिला आहे. वर्ल्ड कपच्या इतिहासात बांगलादेशने पहिल्यांदाच श्रीलंकेचा पराभव केला. मात्र, खेळभावनेच्या वर्तुळात बांगलादेश हा सामना हरल्याचं पहायला मिळतंय. सामन्यातील अँजेलो मॅथ्यूजची (Angelo Mathews) विकेट सर्वात चर्चेचा विषय ठरली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारने बाद देण्यात आलंय. शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) याने बरोबर केलं की चूक? असा सवाल आता विचारला जात आहे. अशातच आता स्वत: शाकिबने सामन्यानंतर यावर प्रतिक्रिया दिली. 

काय म्हणाला Shakib Al Hasan ?

माझा एक सहकारी माझ्याजवळ आला आणि त्याने मला सांगितलं की टाईम आऊटची अपिल कर.. नवीन आलेला खेळाडू बाद होईल. मी अपिल केली, तेव्हा अंपायरने मला विचारलं की, खरंच अपिल केली आहे की मागे घेणार आहात. तेव्हा मी म्हटलं की हे नियमांप्रमाणे आहे. मला माहित नाही, मी बरोबर केलं की चुकीचं... पण मी वॉरच्या परिस्थितीत होतो. या निर्णयामुळे माझा संघ जिंकेल, असं मला वाटलं. बरोबर आहे की चूक मला माहित नाही, पण हा नियम नसता तर मी अपिलच केलं नसतं. मॅथ्यूजशी झालेल्या वादामुळे मला लढण्याची हिंमत आली. मी 36 वर्षांचा आहे आणि सामान्यत: लढणं सहजासहजी येत नाही परंतु आज आनंद झाला, असं शाकिब अल हसनने म्हटलं आहे.

नेमकं काय झालं?

श्रीलंकेचा वरिष्ठ फलंदाज मॅथ्यूज याला फलंदाजीत भोपळाही फोडता आला नाही. तो टाइम आऊट या पद्धतीने बाद झाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा बाद होणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. मॅथ्यूज फलंदाजीसाठी मैदानात येण्यासाठी सज्ज होता. पण त्याच्या हेल्मेटचा पट्टा तुटला होता. त्यामुळे त्याला पुढच्या बॉलसाठी तयार राहण्यास थोडा वेळ लागला. नियमांनुसार, 2 मिनिटांच्या पुढील बॉलसाठी फलंदाजाने तयार व्हायचं असतं. मात्र, मॅथ्यूजला 2 मिनिट आणि 10 सेकंदाचा वेळ लागला अन् शाकिबने टाईम आऊटची अपिल केली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC (@icc)

दरम्यान, दिल्लीच्या मैदानावर खेळला गेलेला हा सामना लज्जास्पद राहिला. 280 धावांचा पाठलाग करताना बांगलादेश जिंकली खरी पण नैतिकतेच्या मैदानात बांगलादेशचा पराभव झालाय. खरी हाईट इथं झाली की, सामना झाल्यानंतर बांगलादेश आणि श्रीलंकेच्या खेळाडूंनी हातमिळवणी (शेकहँड्स) देखील केली नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने सामना वादग्रस्त आणि लज्जास्पद राहिला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.