सिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु असलेल्या (Ind Vs Aus) ३ सामन्यांच्या वनडे सिरीजमधून भारताचे क्रिकेटक हार्दिक पंड्या आणि के एल राहुल यांचं निलंबन करण्यात आलं आहे. आगामी न्यूझीलंड दौऱ्यातून देखील त्यांना बाहेर ठेवण्यात आलं आहे. पंड्या आणि राहुलने 'कॉफी विद करण' या शोमध्ये महिलांच्या बाबतीत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे त्यांच्यावर टीका होऊ लागली होती. याचं गांभीर्य लक्षात घेता बीसीसीआयने (BCCI) देखील त्याचं निलंबन केलं आहे. आता हे दोन्ही खेळाडू ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या सामन्यांमधून बाहेर आहेत.
हार्दिक पंड्या आणि के एल राहुलच्या जागी शुभम गिल आणि विजय शंकर यांना संघात जागा देण्यात आली आहे. पहिल्यांदा शुभमला वनडे टीममध्ये घेण्यात आलं आहे. १९ वर्षाच्या गिलने धमाकेदार प्रदर्शन केलं होतं. रणजी ट्रॉफीमध्ये त्याने १० इनिंगमध्ये ९८.७५ च्या रनरेटने ७९० रन केले. यामध्ये २ शतक आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे. याआधी गिल न्यूजीलंड दौऱ्यात भारत ए टीमचा भाग होता. २०१८ मध्ये भारताच्या अंडर-१९ वर्ल्डकप विजेत्या टीमचा तो सदस्य होता.
विजय शंकरला दुसऱ्यांदा टीममध्ये स्थान मिळालं आहे. याआधी मार्च २०१८ मध्ये निदाहास ट्रॉफीमध्ये त्याला संधी मिळाली होती. त्यावेळी त्याने टी-२० क्रिकेटमध्ये डेब्यू केलं होतं. तमिळनाडूच्या या ऑलराउंडरला हार्दिकच्या जागी घेण्यात आलं आहे. शंकरने न्यूजीलंड दौऱ्यात सर्वाधिक रन केले होते. शंकरने या सिरीजमध्ये फिनिशरची भूमिका निभावली होती. ३ सामन्यांमध्ये त्याने ९४ च्या रनरेटने १८८ रन केले होते.
ICYMI!
Shubman Gill and Vijay Shankar have been called up to India's limited-overs squads in place of the suspended Hardik Pandya and KL Rahul.
➡️ https://t.co/45SqgJ7Uwb pic.twitter.com/Xfeh12xPUg
— ICC (@ICC) January 13, 2019
शंकर ऑस्ट्रेलिया विरुद्ध एडिलेडमध्ये १५ जानेवारीला होणाऱ्या दुसऱ्या वनडेमध्ये टीममध्ये सहभागी होणार आहे. गिल न्यूझीलंड दौऱ्यात टीममध्ये येणार आहे. भारतीय टीम २३ जानेवारीपासून न्यूझीलंडमध्ये ५ वनडे आणि ३ टी-२० सामने खेळणार आहे.