OUT होताच पव्हेलियनमध्ये जाताना शुभमन गिल कोणाला म्हणतो चु#@%*

चांगल्या खेळीनंतरही आऊट झाल्यावर शुभमन गिल आऊट झाल्यानंतर खूप निराश दिसून आला.

Updated: Apr 4, 2022, 12:37 PM IST
OUT होताच पव्हेलियनमध्ये जाताना शुभमन गिल कोणाला म्हणतो चु#@%* title=

मुंबई : आयपीएल 2022 च्या सिझनमध्ये 10 वा सामना गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये रंगला होता. या सामन्यात गुजरात टायटन्सचा विजय झाला. गुजरातच्या टीमने शुभमन गिलच्या 84 रन्सच्या खेळीच्या जोरावर 172 रन्सचं लक्ष्य उभारलं. इतक्या चांगल्या खेळीनंतरही आऊट झाल्यावर शुभमन गिल आऊट झाल्यानंतर खूप निराश दिसून आला. 

दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध शुभमन गिलने 46 बॉल्समध्ये 84 रन्सची तुफान खेळी केली. या इनिंगमध्ये गिलने 183 च्या स्ट्राइकरेटने रन्स केले. यामध्ये 6 चौकार आणि 4 सिक्सचा समावेश आहे. यानंतर खलील अहमदने त्याची विकेट काढली. मात्र आऊट झाल्यानंतर गिल निराश झाल्याचं दिसून आलं. यावेळी मैदानाबाहेर जाताना त्याने अपशब्द वापरल्याचं कॅमेरात कैद झालं आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडीयोही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ही घटना गुजरात टायटन्सच्या डावाच्या 18व्या ओव्हरमघ्ये ही घटना घडली. विशेष म्हणजे जर शुभमन गिल खलीलच्या चेंडूवर बाद झाला नसता आणि डावाच्या शेवटपर्यंत फलंदाजी करू शकला असता तर त्याला या सामन्यात शतक झळकावण्याची चांगली संधी होती. शुभमन व्यतिरिक्त कर्णधार हार्दिक पंड्याने 31 आणि डेव्हिड मिलरने 20 धावा केल्या.

शुभमन गिलच्या वादळी खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सने (Gujrat Titans) दिल्ली कॅपिट्ल्सला (Delhi Capitals) विजयासाठी 172 धावांचे आव्हान दिले आहे. गुजरातने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 171 धावा केल्या. गुजरातकडून गिलने सर्वाधिक 84 धावांची खेळी केली.

या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स 9 विकेट्स गमावत केवळ 157 रन्स करू शकली. यामध्ये दिल्लीकडून पंतने सर्वाधिक 43 रन्स केले. काही कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.