अखेर ती आलीच! Shreyas Iyer च्या कुटुंबात नव्या पाहुणीची एन्ट्री

कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर त्याच्या लॅव्हिश लाईफस्टाईलसाठी ओळखला जातो.

Updated: Jun 3, 2022, 09:57 AM IST
अखेर ती आलीच! Shreyas Iyer च्या कुटुंबात नव्या पाहुणीची एन्ट्री title=

मुंबई : भारतीय फलंदाज आणि कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर त्याच्या लॅव्हिश लाईफस्टाईलसाठी ओळखला जातो. श्रेयस अय्यर मैदानावर जितका गंभीर असतो त्याउलट तो मैदानाबाहेर शांत दिसतो. श्रेयस अय्यरलाही महागड्या गाड्यांचा प्रचंड शौक आहे. तर आता अय्यरच्या कार कलेक्शनमध्ये एका नव्या गाडीची एन्ट्री केली आहे. 

नुकतंच श्रेयस अय्यरने एक आलिशान Mercedes-AMG G 63 4Matic SUV खरेदी केली आहे. या कारची किंमत 2.45 कोटी रूपये इतकी आहे. 

श्रेयस अय्यरची त्याच्या सर्व-नवीन SUV ची डिलिव्हरी घेतानाची फोटो व्हायरल झाले आहेत. Mercedes-AMG G 63 4MATIC हे प्रसिद्ध G-Wagon सिरीजमधील टॉप मॉडेल आहे. या कारच्या स्पीडबद्दल बोलायचं झालं तर ही SUV 0 ते 100 किमी/तासचा वेग फक्त 4.5 सेकंदात पकडते.

सोशल मीडियावर फोटो शेअर करताना, मर्सिडीज-बेंझ लँडमार्क कार्स मुंबईने म्हटलंय, "भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यरचं नवीन मर्सिडीज-बेंझ जी 63 घेतल्याबदद्ल अभिनंदन. स्टार कुटुंबात आम्ही तुमचे स्वागत करतो. तुम्ही या गाडीच्या ड्रायव्हिंगचा तितकाच आनंद घ्याल जितका तुम्ही तुमच्या कव्हर ड्राईव्हचा घेता."

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सची आयपीएलमध्ये कामगिरी फारशी चांगली राहिली नाही. पॉईंट्स टेबलमध्ये केकेआर सातव्या स्थानावर होती. केकेआरच्या टीमने 14 पैकी 6 सामने जिंकले, तर उर्वरित 8 सामन्यात टीमला दारुण पराभवाला सामोरं जावं लागले.