रावळपिंडी एक्स्प्रेसचा खुलासा! 'मी फेकलेला बाऊंसर सचिनच्या बरगड्यांवर लागला आणि....'

सचिन तेंडुलकर संदर्भात शोएब अख्तरने एक मोठा खुलासा केला आहे.

Updated: Oct 22, 2021, 02:16 PM IST
रावळपिंडी एक्स्प्रेसचा खुलासा! 'मी फेकलेला बाऊंसर सचिनच्या बरगड्यांवर लागला आणि....' title=

मुंबई : टी-20 वर्ल्डकप 17 ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे, ज्यामध्ये भारताला 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. झी न्यूजचे मुख्य संपादक सुधीर चौधरी यांनी भारत-पाक टी-20 विश्वचषक सामन्याआधी भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ आणि पाकिस्तानी संघाचा महान वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यांच्या प्राइम टाइम शो डीएनएमध्ये चर्चा केली. दरम्यान या शोमध्ये सचिन तेंडुलकर संदर्भात शोएब अख्तरने एक मोठा खुलासा केला आहे.

शोएब अख्तरने डीएनएमध्ये बोलत असताना सचिन तेंडुलकरबद्दल अनेक मोठे खुलासे केले. या दरम्यान सुधीर चौधरी यांनी शोएबला त्याच्या पुस्तकाबद्दल विचारलं, 'तू तुझ्या पुस्तकात लिहिलं आहेस की राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर सारखे भारतीय खेळाडू तुला घाबरत होते आणि तुला तोंड द्यायला ते तयार नसायचे.' 

प्रतिक्रिया देताना शोएब म्हणाला की, मी असं काही लिहिलं नव्हतं आणि या माध्यमांनी पसरवलेल्या गोष्टी होत्या. मी सचिनचा खूप आदर करायचो आणि त्याला सर्वोत्तम फलंदाज मानतो.

तो म्हणाला, 'मी 2016 मध्ये सचिनच्या घरी गेलो होतो. मग त्याने मला त्यावेळी जेवायला दिलं होतं. तो खूप चांगला कूक आहे आणि तो खूप चांगला माणूसही आहे. मी त्याला म्हणालो की बघ, मी तुझ्याबद्दल हे लिहिलं आहे. तेव्हा सचिन म्हणाला की तू ही गोष्ट सोड. तुला आठवतं की जेव्हा तुम्ही मला गुवाहाटीमध्ये बाउन्सर टाकला होता, तेव्हा तो मला बरगडीवर बसला. सचिनने सांगितलं की, त्यामुळे तिथे फ्रॅक्चर झालं. सौरव गांगुलीने माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र मला श्वास घेता आला नाही. परंतु भारत तिथे अडकला असल्ाने मला बराच वेळ फलंदाजी करावी लागली. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर मला कळलं की मला फ्रॅक्चर झाले आहे."

शोएब पुढे म्हणाला की, "यावेळी भारतीय संघ खूप मजबूत आहे पण खेळ कधीही बदलू शकतो. हा एक अतिशय अवघड खेळ आहे. पाकिस्तानचा संघ सध्या रेटेड आहे पण पाकिस्तानचा संघ आक्रमक खेळेल. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यादरम्यान भारतीय संघ नेहमीच वर्चस्व राखतो. मात्र भारतीय संघ अधिक चांगला खेळत आहे हे पाकिस्तानने स्वीकारलं पाहिजे.