शोएब अख्तरच्या धमकीनं घाबरला हा भारतीय फलंदाज, भीतीमुळे खेळाला नाही आपला फेवरेट शॉट

पाकिस्तानचा माजी आक्रमक बॉलर शोएब अख्तरने काय दिली होती धमकी?

Updated: May 17, 2021, 03:05 PM IST
शोएब अख्तरच्या धमकीनं घाबरला हा भारतीय फलंदाज, भीतीमुळे खेळाला नाही आपला फेवरेट शॉट title=

मुंबई: शोएब अख्तरची आक्रमक गोलंदाज म्हणून जशी जगभरात ख्याती आहे तशीच त्याच्या आक्रमकपणाची चर्चाही तेवढीच आहे. त्याने आपल्याच संघातील एका खेळाडूच्या डोक्यात संतापाच्या भरात बॅट घालण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार 2007च्या ICC टी 20 वर्ल्डकप दरम्यान घडल्याचा प्रकर जगभरात चर्चेत असतानाच आणखी एक किस्सा समोर आला आहे. शोएब अख्तरने भारतीय फलंदाजाला देखील धमकी दिली होती. या धमकीच्या धास्तीनं फलंदाजाने आपला फेवरेट शॉट खेळणंच सोडून दिलं होतं. 

रॉबिन उथप्पाने अलीकडे आपल्या आंतरराष्ट्रीय सामन्यांदरम्यानचा एक खास किस्सा सांगितला आहे. शोएब अख्तरने रॉबिन उथप्पाला धमकावलं होतं. शोएबच्या बॉलरवर त्याने मारलेल्या शॉटनंतर उथप्पाला जी धमकी मिळाली ती तो आजही विसरू शकला नाही. 

बाप रे! शोएब अख्तरचा संताप सुटला; बॅट घेऊन खेळाडूला मारायला सुटला

भारत विरुद्ध पाकिस्तान गुवाहाटीमध्ये झालेल्या सामन्याचा किस्सा उथप्पाने सांगितला आहे. 'शोएबने यॉर्कर टाकला होता. तो खेळण्यात मी यशस्वी ठरलो. त्यानंतर त्याने पुढचा बॉल टाकला आणि मी चौकार ठोकला. त्यानंतर शोएबने एक लेंथ बॉल खेळला. त्यावर मी पाय पुढे घेऊन 'वॉकिंग शॉट' मारला आणि तोही चौकार बसला. माझ्या चौकारामुळे भारतीय संघाला त्यावेळी विजय मिळाला.' 

युवी आणि भज्जीमुळे विराट कोहलीने पकडले सचिन तेंडुलकरचे पाय, नेमका काय प्रकार

'पुढचा सामना ग्वाल्हेरमध्ये होता. त्यावेळी रात्रीच्या जेवणावेळी शोएबनं माझं कौतुक केलं मात्र त्यासोबत धमकीही दिली. पुढच्या वेळी वॉकिंग शॉट मारला तर काय होईल हे माहित नाही. मी थेट तुझ्या डोक्यावर बीमर टाकू शकतो. या नंतर मी आयुष्यात समोर शोएब खेळायला आल्यानंतर कधीच हा शॉट भीतीपोटी खेळलो नाही', असं रॉबिन उथप्पाने सांगितलं आहे.