मुंबई: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली एक उत्तम फलंदाज म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. ICC च्या सर्व फायनल्स खेळलेला तो एकमेव खेळाडू आहे. या कोहलीचा एक मजेशीर किस्सा समोर आला आहे. कोहलीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे पाय धरले होते. हा किस्सा सचिन तेंडुलकरने स्वत: सांगितला आहे.
सचिन तेंडुलकरला प्रत्येक खेळाडू रॉल मॉडेल मानतो. जवळपास प्रत्येकानं त्याला खेळताना पाहिलं आहे. ड्रेसिंग रूममध्ये त्याच्यासोबत एक किस्सा झाला होता. युवराज सिंह आणि हरभजन सिंह यांच्यामुळे विराट कोहलीनं सचिनचे पाय धरले होते. नेमकं काय कारण होतं जाणून घेऊया.
सचिन तेंडुलकरने एका युट्यूब शो दरम्यान हा किस्सा सांगितला. 2008 रोजी विराट कोहलीची टीम इंडियामध्ये खेळण्यासाठी निवड करण्यात आली. त्यानंतर लगेच युवी आणि भज्जी यांच्यामुळे विराट कोहलीला सचिनचे पाय धरावे लागले.
सचिन तेंडुलकर म्हणाला की, 'जेव्हा कोहली माझ्या पाया पडला त्याने माझे पाय धरले तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं. हे काय सुरू आहे असं मला वाटलं. विराट कोहली पाय धरतोय हे पाहून इतर खेळाडू खो खो हसत होते. मी विराटला विचारलं हे तू काय करतोय? याची काहीच आवश्यकता नाही अशा गोष्टी होत नाहीत. कोहली उठला आणि आम्ही दोघंही बाकीच्यांकडे पाहिलं तर ते हसत होते.'
'युवराज सिंह आणि हरभजनने मिळून विराट कोहलीसोबत प्रॅन्क केला होता. त्यांनी सांगितलं होतं. सचिनपाजी जसे दिसतील तसं त्यांचे पाय धर. जो खेळाडू टीममध्ये पहिल्यांदा येतो तो अशा पद्धतीने सचिनचे पाय धरतो. ही आमची परंपरा आहे आता तुझी टर्न आहे असं सांगत त्याच्यासोबत प्रॅन्क केला होता. '
विराट कोहलीला याची जराही कल्पना नव्हती. संघात पहिल्यांदाच निवड झाल्यानंतर त्याने माझे पाय धरले तेव्हा मी त्याला उठून सांगितलं असं काही होत नाही आणि सर्वांना हसताना पाहिल्यानंतर तो प्रॅन्क होता हे समोर आलं.