शोएबने शेअर केला फोटो, लोकांनी पकडला 'फ्रॉड'

या टीममध्ये अनेक चेहरे १९ वर्षाहूनही अधिकचे दिसत असल्याचेही काहीजणांना वाटतयं.

Updated: May 9, 2018, 12:10 PM IST
शोएबने शेअर केला फोटो, लोकांनी पकडला 'फ्रॉड'  title=

नवी दिल्ली : तुम्ही हा फोटो पाहिला का ? अजूनही ओळख पटली नसेल तर सांगू इच्छितो की यामध्ये एक रावळपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तरदेखील आहे. वेगवान बॉलर्सच्या यादीतील अग्रस्थान म्हणून शोएब अख्तरला ओळखल जायचय एक जमाना होता जेव्हा दीड कि.मी अंतर धावून तो वेगाने बॉल फेकायचा. त्यावेळी बॅट्समन्सचे पायही थरथर कापायचे. याच शोएबने ट्विटरवर आपला एक फोटो शेयर केलाय. खूप जुना फोटो आहे हा. जेव्हा शोएब अख्तर कोण आहे याची जगाला ओळख नव्हती तेव्हाचा हा फोटो. या फोटो ट्विट करताना त्याने कॅप्शनही जोडली आहे.

 मी जेव्हा अंडर १९ टीममधून खेळायचो तेव्हाचा हा फोटो असे शोएबने या फोटोसोबत लिहिले आहे.

पण लोक हे मानायला तयारच नाहीत.

ट्विटरवरही शोएबच्या फॉलोअर्सची संख्या खूप मोठी आहे. त्याच्या चाहत्यांनाही या फोटोत काहीतरी गडबड वाटतेय.

या फोटोत मला ओळखा असे शोएबने म्हटले आहे. कोपऱ्यात खाली बसलेल्या शोएबला त्याच्या बऱ्याच चाहत्यांनी त्याला अगदी बरोबर ओळखल.

पण हा फोटो अंडर १९ चा असल्याचे मानण्यास ते तयार नाही. हा फोटो त्याहून लहानपणीचा असल्याचे अनेकांचे मत आहे. तर १६ जणांच्या या टीममध्ये अनेक चेहरे १९ वर्षाहूनही अधिकचे दिसत असल्याचेही काहीजणांना वाटतयं.