दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेआधी टीम इंडियाला मोठा धक्का, फलंदाजी करताना स्टार खेळाडू गंभीर जखमी

भारताच्या विस्फोटक फलंदाजाला मैदानात दुखापत झाल्याची घटना घडलीय. 

Updated: Jun 6, 2022, 09:19 PM IST
दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेआधी टीम इंडियाला मोठा धक्का, फलंदाजी करताना स्टार खेळाडू गंभीर जखमी  title=

मुंबई : भारताच्या विस्फोटक फलंदाजाला मैदानात दुखापत झाल्याची घटना घडलीय. या घटनेत तो मैदानात वेदनेने व्हिवळताना दिसून आला होता. या संदर्भातील व्हिडिओ देखील समोर आला आहे. या घटनेने टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय.  

रणजी ट्रॉफीच्या तिसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात उत्तर प्रदेश विरुद्ध कर्नाटक सामना सुरु आहे. या सामन्यात कर्नाटक संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा सलामीवीर मयंक अग्रवाल गंभीर जखमी झाला असून, त्यानंतर तो मैदानावरच वेदनेने व्हिवळताना दिसला. या संदर्भातला व्हिडिओ क्रिकेट 8077 या युट्यूब अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे. 

अग्रवालची टी-20 मालिका आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियामध्ये निवड झाली नसल्याने सध्या तो रणजी ट्रॉफीसाठी खेळतोय. 

सामन्याच्या 7 व्या षटकात ही घटना घडली. शिवम मावी पहिले षटक टाकण्यासाठी आला. मावीने शेवटचा चेंडू लहान केला, ज्यावर मयंक अग्रवाल पूर्णपणे फटकेबाजीत पडला आणि चेंडू आधी त्याच्या हाताला लागला आणि नंतर बरगड्यांना जाऊन लागला. चेंडू अंगावर आदळल्यानंतर तो वेदनेने ओरडताना दिसला. यानंतर फिजिओ मैदानावर आला आणि मयंकने त्याची तपासणी केली. बॉल लागल्यानंतरही मयंकने फलंदाजी सुरूच ठेवली.मात्र तो फार काही करू शकला नाही आणि 10 धावा करून पॅव्हेलियनमध्ये गेला.

आयपीएलमध्येही झाली दुखापत 

आयपीएल 2022 मध्ये देखील सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्धच्या साखळी सामन्यात उमरान मलिकच्या चेंडूवर मयंक अग्रवाल जखमी झाला होता. त्या सामन्यात उमरानने शॉर्ट पिच बाऊन्स बॉल टाकला, तो मयंकच्या बरगडीला जाऊन लागला होता. त्या चेंडूवर मयंकने कसा तरी लेग बायची धाव घेतली होती, पण दुखण्यामुळे तो खेळपट्टीवर पडून राहिला.