Ireland vs India: एक वादळी इनिंग अन् धोनीच्या चेल्याने नशिब काढलं; थेट टीम इंडियामध्ये एन्ट्री!

IND vs IRE, Shivam Dubey:  आर्यलँड दौऱ्यात नव्या छाव्यांना संधी देण्यात आलीये. त्यातील एक नवा म्हणजे शिवम दुबे... एका वादळी इनिंगमुळे शिवम दुबेची (Shivam Dubey) थेट टीम इंडियात एन्ट्री झालीये.

सौरभ तळेकर | Updated: Jul 31, 2023, 09:55 PM IST
Ireland vs India: एक वादळी इनिंग अन् धोनीच्या चेल्याने नशिब काढलं; थेट टीम इंडियामध्ये एन्ट्री! title=
IND vs IRE, Shivam Dubey

Irealand vs Team india t20i series: एकदिवसीय वर्ल्ड कप (ODI World Cup 2023) आणि आशिया कप (Asia Cup) स्पर्धेपूर्वी बीसीसीआयने आर्यलँड दौरा नियोजित केला आहे. अशातच आता आर्यलँड दौऱ्यासाठी टीम इंडिया जाहीर झाली असून जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) खांद्यावर टीम इंडियाची धुरा असणार आहे. तर ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) उपकर्णधार करण्यात आलंय. या दौऱ्यात नव्या छाव्यांना संधी देण्यात आलीये. त्यातील एक नवा म्हणजे शिवम दुबे... एका वादळी इनिंगमुळे शिवम दुबेची (Shivam Dubey) थेट टीम इंडियात एन्ट्री झालीये.

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळताच शिवम दुबेने (Shivam Dube) आपला जबरदस्त फॉर्म दाखवण्यास सुरुवात केली आहे. देवधर ट्रॉफीमध्ये (Deodar Trophy) शिवम दुबे याने नॉर्थ झोनविरुद्ध 260 धावांचा पाठलाग करताना वेस्ट झोनच्या संघाने अवघ्या 90 धावांत तीन विकेट गमावल्या होत्या. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या या डावखुऱ्या फलंदाजाने प्रथम हळुवार सुरूवात करत नंतर टॉप गियर टाकला अन् 78 चेंडूत नाबाद 83 धावा फटकावल्या. त्याच्या या खेळीची देखील बीसीसीआयने दखल घेतली. बीसीसीआयने  (BCCI) ट्विटर हँडलवर त्याचा व्हिडिओ शेअर केला होता.

पाहा Video

दरम्यान, शिवम दुबे गेल्या काही दिवसांपासून चांगल्या फॉर्ममध्ये दिसत असल्याने त्याला संधी कधी मिळणार यावर सर्वाचं लक्ष होतं. आशियाई क्रीडा स्पर्धा आणि आता आर्यलँड दौऱ्यात (IND vs IRE) संधी मिळाल्याने आता धोनीच्या शागिर्दानं नशिब काढलं, अशी चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहे.

आयर्लंड विरुद्ध vs इंडिया | टी 20 मालिकेचं वेळापत्रक (India vs Ireland Time table)

आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया, पहिला सामना, 18 ऑगस्ट.

आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया, दुसरा सामना, 20 ऑगस्ट.

आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया, तिसरा सामना, 23 ऑगस्ट.

आर्यलँड दौऱ्यासाठी टी-ट्वेंटी संघ:

जसप्रीत बुमराह (C), ऋतुराज गायकवाड (VC), यशस्वी जयस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (WC), जितेश शर्मा (WC),  शिवम दुबे, डब्ल्यू सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान.