म्हणून शिखर धवनची दुसऱ्या टेस्टमधून माघार

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमधून भुवनेश्वर कुमार आणि शिखर धवननं माघार घेतली.

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Nov 24, 2017, 08:50 PM IST
म्हणून शिखर धवनची दुसऱ्या टेस्टमधून माघार title=

नागपूर : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमधून भुवनेश्वर कुमार आणि शिखर धवननं माघार घेतली. या दोघांनी माघार घेतल्यामुळे भारतानं मुरली विजय आणि रोहित शर्माला टीममध्ये संधी दिली. भुवनेश्वर कुमारनं लग्न असल्यामुळे या टेस्टमधून माघार घेतली तर शिखर धवननं वैयक्तिक कारण दिलं. पण आता धवननं माघार का घेतली याचं खरं कारण समोर आलं आहे.

बहिणीचं लग्न असल्यामुळे शिखर धवननं या टेस्टमधून माघार घेतली. इन्स्टाग्रामवर शिखर धवननं बहिणीच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. याआधी शिखर धवननं सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन वनडेमधून माघार घेतली होती. बायको आजारी असल्यामुळे शिखर धवन ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळू शकला नव्हता. त्याआधी आई आजारी असल्यामुळे धवन श्रीलंका दौरा संपायच्या आधीच भारतात परतला होता.

सोमवारी बीसीसीआयनं धवन आणि भुवनेश्वर कुमार हे दुसऱ्या टेस्टसाठी उपलब्ध असणार नाहीत, ही माहिती दिली होती. २३ नोव्हेंबरला भुवनेश्वर कुमारचं मेरठमध्ये लग्न झालं. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नागपूरमध्ये मॅच असल्यामुळे भुवनेश्वरला मॅचमध्ये खेळणं अशक्य होतं. 

 

Congrats to my sister and Bason for getting married. Welcome to the club and God bless them @ba_son15 @aesha.dhawan5

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial) on

 

All set for my lovely sister wedding #BSwedding .

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial) on