शिखर धवनचं शतक तर कोहली अर्धशतक करून आऊट

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये शिखर धवननं शानदार शतक झळकावलं आहे.

Updated: Feb 10, 2018, 07:34 PM IST
शिखर धवनचं शतक तर कोहली अर्धशतक करून आऊट  title=

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये शिखर धवननं शानदार शतक झळकावलं आहे. शिखर धवनचं वनडे क्रिकेटमधलं हे १३वं शतक आहे. मुख्य म्हणजे शिखर धवननं त्याच्या १००व्या वनडेमध्ये हे शतक ठोकलं आहे.

टॉस जिंकून या मॅचमध्ये भारतानं पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पण रोहित शर्मा पुन्हा एकदा स्वस्तात आऊट झाला. यानतंर शिखर धवननं विराट कोहलीच्या मदतीनं भारताचा डाव सावरला. विराट कोहली ८३ बॉल्समध्ये ७५ रन्स करून आऊट झाला. विराट कोहलीनं याआधी सीरिजमध्ये दोन शतकं झळकावली आहेत. तर शिखरनं या शतकाआधी या सीरिजमध्ये अर्धशतकही केलं होतं.

विराट कोहलीची विकेट गेल्यानंतर अजिंक्य रहाणे बॅटिंगला आला आहे. पण पाऊस सुरु झाल्यामुळे मॅच थांबवण्यात आली आहे. ३४.२ ओव्हरमध्ये भारताचा स्कोअर २००/२ एवढा आहे. दक्षिण आफ्रिकेच्या रबाडानं रोहित शर्माची तर क्रिस मॉरिसनं विराट कोहलीची विकेट घेतली.

पहिल्या तीन वनडेमध्ये भारताचा विजय झाल्यानंतर आता चौथी वनडे जिंकून सीरिज खिशात टाकण्यासाठी भारतीय टीम मैदानात उतरत आहे. याआधी भारतानं कधीच दक्षिण आफ्रिकेमध्ये वनडे सीरिज जिंकलेली नाही. याआधी २०१०-१ मध्ये महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वात २-१ ने पुढे असतांना देखील नंतर भारताचा ३-२ ने पराभव झाला होता.

भारताचे स्पिनर्स युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. पहिल्या तीन मॅचमध्ये ३० पैकी २१ विकेट या दोघांनी घेतल्या आहेत. तर विराट कोहलीनंही मागच्या मॅचमध्ये १६० रन्सची खेळी केली होती. पण रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याचा फॉर्म भारतासाठी चिंतेची बाब असेल.

एबी डिव्हिलियर्सचं कमबॅक

बोटाच्या दुखापतीमुळे पहिल्या तीन वनेडला मुकलेल्या एबी डिव्हिलियर्सनं या मॅचमध्ये कमबॅक केलं आहे. फॅप डुप्लेसिस आणि क्विंटन डीकॉक मात्र अजूनही टीममध्ये नाहीत.

अशी आहे भारतीय टीम

रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, एम.एस.धोनी, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह

स्कोअरबोर्ड पाहण्यासाठी क्लिक करा